Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज तरुणाचा गुप्तीने भोसकून खून करण्याचा प्रयत्नः पुण्यातील घटना, पोलिसांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या

तरुणाचा गुप्तीने भोसकून खून करण्याचा प्रयत्नः पुण्यातील घटना, पोलिसांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे शहरातील कॅम्प परिसरात थाउजंड ऑफ चौक जवळ एका 18 वर्षीय तरुणाच्या छातीत गुप्तीने भोसकून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी टरम्मा उर्फ रोहित पालके (वय 44) या आरोपीवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा पोलिसांकडून दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मोहन आढगळे (वय 35, राहणार – हडपसर, पुणे) यांनी आरोपीविरोधात लष्कर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे . तक्रारदार यांचा 18 वर्षाचा मुलगा ओंकार हा त्याच्या मित्र 2 मित्रांसोबत थाउजंड ऑफ चौकाजवळील फूटपाथवर बोलत बसला होता. त्यावेळी आरोपीने या ठिकाणी येऊन तुला मारून टाकेल, अशी धमकी दिली. तसेच मुलाला जीवे ठार मारण्याचे उद्देशाने कंपाऊंडच्या भिंतीवरून गुप्ती काढली व मुलाच्या छातीच्या खाली डाव्या बाजूला हृदयाजवळ भोकसून त्यास गंभीर जखमी केले आणि जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे करत आहे.

बसमध्ये दागिने चोरी करणारे दोघे जेरबंद

शिवाजीनगर परिसरातील पुणे मनपाजवळ छत्रपती शिवाजी ब्रिजवर बस स्टॉप वरून पुणे ते चिंचवड गावाकडे जाणाऱ्या पीएमपीएमएल बस मध्ये मंदाकिनी काळाराम फुगे ( वय -70, राहणार – पिंपरी चिंचवड, पुणे) या प्रवास करत होत्या. त्यावेळी आरोपींनी त्यांच्या उजव्या हातातील 1 लाख 30 हजार रुपये किमतीची 25 ग्रॅम वजनाची सोन्याची बांगडी कटरच्या साह्याने तोडून हातातून हिसकवून घेऊन बांगडीसह पळून जात होते. त्यावेळी आरोपी अमित नाना चव्हाण (वय -27, राहणार- हडपसर, पुणे) आणि नेहा बबन सोनवणे (22, राहणार – निगडी, पुणे) या 2 आरोपींना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस बडे करत आहेत.

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments