Monday, December 11, 2023
Home क्राईम न्यूज तरुणांनो अभ्यासाला लागा, MPSC मध्ये प्रथमच मेगा भरती, हजारो जागा भरणार

तरुणांनो अभ्यासाला लागा, MPSC मध्ये प्रथमच मेगा भरती, हजारो जागा भरणार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे | 11 नोव्हेंबर 2023 : शासकीय सेवेचे अनेक तरुणांचे स्पप्न असते. आता हे स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) रखडलेल्या भरती प्रक्रियेला वेग दिला आहे. एसपीएससीमध्ये हजारो पदांची भरती होणार आहे. मंडळाने तब्बल २१ हजार जागांची भरती प्रक्रिया सुरु केली आहे. त्यासाठी अनेक पदांच्या जाहिराती काढल्या आहे. तसेच डिसेंबर महिन्यांत अनेक पदांच्या जाहिराती निघणार आहे. आठ महिन्यांत ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती एमपीएससी आयोगाने प्रभारी अध्यक्ष डॉक्टर दिलीप पांढरपट्टे यांनी दिली. यामुळे एमपीएससीची तयारी करणाऱ्या युवकांचे शासकीय सेवेचे स्वप्न साकार होणार आहे.

प्रथमच मेगा भरती

राज्य शासनाकडून मागणीपत्रे आल्यानंतर भरती प्रक्रिया आयोगाकडून सुरु करण्यात येते. गेल्या वर्षभरात अ, ब आणि अराजपत्रिक ब गटासह लिपिक पदांच्या भरतीसाठी तब्बल २१ हजार जागांची विविध विभागांकडून मागणी झाली. या पदांची भरती प्रक्रिया विविध टप्प्यांवर आहे. आठ महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर भरती झाली.

गेल्या पाच वर्षांत किती झाली भरती

एमपीएससीमार्फत प्रथमच २१ हजार पदे भरली जात आहेत. गेल्या पाच वर्षांत २०१७-१८ मध्ये सर्वाधिक ९ हजार २०७ पदे भरली गेली होती. सर्वात कमी पदे २०१९-२० मध्ये भरली गेली. त्या वर्षांत ३ हजार ३६६ पदे भरली गेली. मागील दोन वर्षांत आठ हजार पदांची भरती झाली. २०२१ मध्ये ३, ३९१ तर २०२२ मध्ये ४, ५५७ पदे भरली गेली.

• २०२१-२२ मध्ये ४,५५७ पदे भरली गेली.

• २०२०-२१ मध्ये ३,३९१ पदे भरली गेली.

• २०१९-२० मध्ये ३,३६६ पदे भरली गेली.

• २०१८-१९ मध्ये ५,७९२ पदे भरली गेली.

• २०१७-१८ मध्ये ९,२०७ पदे भरली गेली.

• २०१६-१७ मध्ये ४,३३३ पदे भरली गेली.

• २०१५-१६ मध्ये ६७०७ पदे भरली गेली.

अ, ब गटात सर्वाधिक पदे वैद्यकीय शिक्षणमध्ये

एमपीएससी भरतीत अ आणि ब गटात सर्वाधिक पदे वैद्यकीय शिक्षण विभागात भरली जाणार आहे. तब्बल २ हजार पदे भरली जाणार

• आहे. सामान्य प्रशासन विभागात १९००, वित्त विभागात १६०० गृह विभागात ११९८४ तर सार्वजनिक आरोग्य विभागात ६७०७ पदे भरली जातील. एमपीएससीकडून आठ महिन्यांत ही भरती पूर्ण होईल. गेल्या तीन वर्षांत ६० हजार पदे निवृत्तीमुळे रिक्त झाली आहेत. तसेच आधीपासूनची पदे धरली तर हा बॅकलॉग दोन लाखांवर गेला आहे. तो या भरतीमुळे कितपत भरून निघेल, असा प्रश्न महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई यांनी उपस्थित केला आहे.

RELATED ARTICLES

‘या’ बँकेत भरती प्रक्रिया सुरू, ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख, लगेचच करा अर्ज

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई : पदवीधरांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे तुम्ही कोणत्याही विषयात पदवी घेतली असेल तरीही तुम्हाला थेट बँकेत नोकरी...

पिंपरी चिंचवड महापालिकेतील अधिकाऱ्यांवर आयुक्तांचा नाही अंकुश, प्रशासनाबाबत तक्रारी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : महापालिकेच्या कारभारावर आयुक्तांचा अंकुश नसल्याचा आरोप होत आहे. विविध विभागांचे प्रमुख तसेच अधिकारी काम करत नसल्याच्या तक्रारी...

एक दिवसासाठी काम बदलले अन् जीव वाचला! आगीतून वाचलेल्या रेणुका ताथोड यांची ‘आपबीती’

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : "दररोज स्पार्कल कँडलला स्टिकर लावण्याचे काम करायचे. पण, शुक्रवारी स्पार्कल कँडलला टोपण लावायचे काम दिले. त्यामुळे आग...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘या’ बँकेत भरती प्रक्रिया सुरू, ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख, लगेचच करा अर्ज

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई : पदवीधरांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे तुम्ही कोणत्याही विषयात पदवी घेतली असेल तरीही तुम्हाला थेट बँकेत नोकरी...

पिंपरी चिंचवड महापालिकेतील अधिकाऱ्यांवर आयुक्तांचा नाही अंकुश, प्रशासनाबाबत तक्रारी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : महापालिकेच्या कारभारावर आयुक्तांचा अंकुश नसल्याचा आरोप होत आहे. विविध विभागांचे प्रमुख तसेच अधिकारी काम करत नसल्याच्या तक्रारी...

एक दिवसासाठी काम बदलले अन् जीव वाचला! आगीतून वाचलेल्या रेणुका ताथोड यांची ‘आपबीती’

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : "दररोज स्पार्कल कँडलला स्टिकर लावण्याचे काम करायचे. पण, शुक्रवारी स्पार्कल कँडलला टोपण लावायचे काम दिले. त्यामुळे आग...

कसबा पेठेतील तीन मजली जुन्या महाजन वाड्याला भीषण आग लागली.

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : कसबा पेठेतील मोटे मंगल कार्यालयाजवळील तीन मजली जुन्या महाजन वाड्याला सोमवारी पहाटे ४ वाजता भीषण आग लागली....

Recent Comments