Thursday, November 30, 2023
Home क्राईम न्यूज तब्बल १ लाख १० हजार प्रलंबित दावे निकाली! लोकअदालतीत पुणे टॉप; ३९५...

तब्बल १ लाख १० हजार प्रलंबित दावे निकाली! लोकअदालतीत पुणे टॉप; ३९५ कोटींची तडजोड

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये सर्वाधिक प्रकरणे निकाली काढण्याची परंपरा पुणे जिल्ह्याने यंदाही कायम ठेवत पहिला क्रमांक मिळविला. तब्बल १ लाख १० हजार १९२ प्रलंबित दावे निकाली काढण्यात आले. त्यात ३९६ कोटी २ लाख ९९ हजार २०० रुपयांची तडजोड शुल्क वसूल करण्यात आले.

प्रमुख जिल्हा न्यायाधीश व पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष श्याम चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील यांनी लोकअदालतीचे आयोजन केले होते. दाखल व दाखलपूर्व दावे निकाली काढण्यासाठी १३३ पॅनेल नियुक्त करण्यात आले होते.

३९६ कोटी रुपयांचे तडजोड शुल्क वसूल-

दाखलपूर्व स्वरुपाचे २ लाख १६ हजार ८६ दावे लोकअदालतीत ठेवण्यात आले होते. त्यापैकी ७९ हजार ९५६ दावे निकाली काढण्यात आले. त्यातून ७६ कोटी २१ लाख ९४ हजार २५३ रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. तर ७२ हजार ४७७ प्रलंबित प्रकरणांमधून ३० हजार २३६ प्रकरणे निकाली काढण्यात आले. त्यात ३१९ कोटी ८१ लाख ४ हजार ९४७ रुपयांचे तडजोड शुल्क वसूल करण्यात आले.

दाव्याचा प्रकार निकाली दाव्यांची संख्या

– तडजोड पात्र फौजदारी गुन्हे -२९३८५

– बँकेची कर्जवसुली – ३५५२

– निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अॅक्ट – २२१२

– वैवाहिक विवाद- २८५

– वीज देयक – १५७

– मोटार अपघात दावे न्यायाधिकरण १४६

– कामगार विवाद खटले – ७१

– भूसंपादन – १०३

– इतर दिवाणी – ९२४

– पाणी कर ६८१८०

– ग्राहक विवाद- १८

– इतर ५१८६

एकूण – १,१०,१९२

पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने यंदा देखील दावे निकाली काढण्यात अग्रेसर राहण्याची परंपरा कायम राखली आहे. यावेळी पॅनेलची संख्या देखील राज्यात सर्वाधिक होती. या यशस्वी आयोजनासाठी जिल्ह्याच्या सर्व न्यायालयातील अधिकारी-कर्मचारी, विविध विभागांचे अधिकारी, पोलिस प्रशासन, आणि नागरिकांचे चांगले सहकार्य मिळाले आहे. लोकअदालतमध्ये तडजोड केल्यास पक्षकारांचा वेळ, पैसा वाचतो. होणाऱ्या मानसिक त्रासातून सुटका होते.

RELATED ARTICLES

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

आंबेगाव तालुक्यातील अवसरी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) अवसरी आयेगाव तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या जवसरी खुर्द, अवसरी बुद्दक, गावडेवाडी या परिसरात पाऊस झाला. अवसरी खुर्द येथे साडेतीन...

Recent Comments