Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज तडीपार असतांना पुणे शहरात वावरणाऱ्या दोघांना अटकः रेकॉडवरील एका आरोपीकडून पिस्टल,...

तडीपार असतांना पुणे शहरात वावरणाऱ्या दोघांना अटकः रेकॉडवरील एका आरोपीकडून पिस्टल, काडतुसे जप्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

वरिष्ठाच्या आदेशानुसार पुणे शहरातील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार, तडीपार आरोपी व पाहिजे फरार आरोपी तपासण्यात येत आहेत. यादरम्यान तडीपार असणारे दोन आरोपी शहारत आढळून आले आणि एक रेकॉडवरील गुन्हेगार पिस्टलसह आढळून आला. सिंहगड रोड पोलिसांनी तीनही आरोपीना अटक केली आहे.

अश्विन उर्फ बारक्या बाळकृष्ण लोणार (वय-१९, रा. खडक चौक, धायरी), दिनेश लक्ष्मण ढवळे (वय-२७, रा. आनंदनगर, सिंहगड रस्ता), फैजल उर्फ सायको अफजल हुसेन (वय-२३, रा. धायरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

धायरी येथील खडक चौक येथे एक जण हातात पिस्टल घेऊन जण उभा असल्याची माहिती पोलीस अंमलदार शिवाजी क्षीरसागर आणि स्वप्नील मगर यांना मिळाली होती. यानंतर सापळा रचून अश्विन उर्फ बारक्या बाळकृष्ण लोणार या आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे एक पिस्टल आणि जिवंत काडतूस असा ४५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तसेच रेकॉडवरील गुन्हेगार तपास करत असतांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेले आरोपी दिनेश लक्ष्मण ढवळे आणि फैजल उर्फ सायको अफजल हुसेन हे आढळून आहे. सिंहगड पोलिसांनी या तीनही आरोपीना असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन निकम करत आहेत.

ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक अप्पासाहेब शेवाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, पोलीस निरीक्षक जयंत राजूरकर, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन निकम, पोलीस अंमलदार आबा उत्तेकर, संजय शिंदे, राजू वेंगरे, स्वप्नील पाटील आदींच्या पथकाने केली.

 

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments