Saturday, February 15, 2025
Homeक्राईम न्यूजतक्रारवाडी येथे विद्युत रोहित्राचा स्फोट, आगीत विद्युत रोहीत्र जळून खाक

तक्रारवाडी येथे विद्युत रोहित्राचा स्फोट, आगीत विद्युत रोहीत्र जळून खाक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : तक्रारवाडी गावामध्ये विद्युत रोहित्राचा स्फोट होऊन अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. तक्रारवाडी ग्रामपंचायत समोरील विद्युत रोहित्र काल (गुरुवार) एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले. त्यानंतर सदरील विद्युत रोहित्र हे गावातील मच्छी मार्केटच्या पाठीमागे नेऊन बसविण्यात आले होते. काल गुरुवारी (दि.30) रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अचानक विद्युत रोहित्राचा स्फोट होऊन त्याने पेट घेतला.

विद्युत रोहितला मधील ऑइल बाहेर फेकल्या गेल्यामुळे आगीने प्रचंड रूप धारण केले. त्यामुळे आगीच्या ज्वाला उंच उडालेल्या पाहायला मिळाल्या. अचानक लागलेल्या या आगीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. विद्युत रोहित्राला आग लागल्यानंतर विद्युत रोहीत्राबरोबर केबल व इतर साहित्यही जळून खाक झाले आहे.

विद्युत रोहित्राला लागलेल्या आगीमुळे तक्रारवाडीतील नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली. आग लागल्यानंतर बराच वेळ झाला तरी विद्युत कर्मचारी मात्र हजर झाले नव्हते. त्यामुळे उपस्थित नागरिकांनी संताप व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments