Tuesday, January 14, 2025
Homeक्राईम न्यूजतक्रारवाडीत अंगणवाडी केंद्राजवळ वराहांचा मुक्त संचार; लहानग्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

तक्रारवाडीत अंगणवाडी केंद्राजवळ वराहांचा मुक्त संचार; लहानग्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

सागर जगदाळे / भिगवण : इंदापूर तालुक्यातील तक्रारवाडी गावातील लहान मुलांसाठी चालविल्या जात असलेल्या अंगणवाडी केंद्राजवळ वराह प्राण्यांचा मुक्त संचार पाहायला मिळत आहे. अंगणवाडी शाळेला कुठल्याही प्रकारची सुरक्षित जाळी अथवा भिंत नसल्याने अंगणवाडी केंद्राच्या मैदानात वराहांचा मुक्त संचार पाहायला मिळतोय. काही महिन्यांपूर्वी भिगवण परिसरात या वराहांचा बंदोबस्त करण्यात आला होता. परंतु आता परत तक्रारवाडी गावात या वराहांची संख्या वाढत चालली आहे.

अंगणवाडी केंद्राजवळ वराहांचा मुक्त संचार आढळून आल्याने विध्यार्थ्यांच्या आरोग्याचा व सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत तक्रारवाडी ग्रामपंचायतीने वेळीच ती खबरदारी घ्यावी अशी मागणी पालकवर्गातून होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments