Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज तंबाखूच्या बहाण्याने बाप-लेकाला सव्वा लाखांनी लुटलेः लुटमार करणाऱ्या टोळीस सहकार ...

तंबाखूच्या बहाण्याने बाप-लेकाला सव्वा लाखांनी लुटलेः लुटमार करणाऱ्या टोळीस सहकार पोलिसांनी केली अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

तंबाखू मागण्याचा बहाणा करीत डिलीव्हरी करणाऱ्या बाप-लेकाला बेदम मारहाण करीत लुटणाऱ्या टोळीला सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 1 लाख 17 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही घटना 9 फेब्रुवारीला धनकवडी परिसरात घडली होती.

शंतनु मारूती लोहार (वय 18, रा. प्रभात चौक, धनकवडी), मंगेश ऊर्फ मंग्या हनुमंत चौरे (वय 21, रा. धनकवडी,), अविष्कार ऊर्फ अव्या अशोक दिघे (वय २२ रा. रामदेव हाईट्स गुलाबनगर, धनकवडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

फिर्यादी त्यांच्या वडीलांसह कंपनीत डिलीव्हरी बॉय म्हणुन नोकरी करतात. ९ फेबुरवारीला ते वडीलांसह नवनाथनगर धनकवडीत डिलीव्हरी करण्यासाठी जात होते. त्यावेळी टोळक्याने त्यांना तंबाखु मागण्याचा बहाणा करुन मारहाण केली. त्यांचा मोबाईल चोरी करून नेला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपासाला गती दिली.

आरोपींची माहिता पोलिस अंमलदार महेश मंडलीक आणि सागर कुंभार यांना मिळाली. ते कात्रजकडून नवले पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत दुचाकीवर थांबल्याचे समजले. तपास पथकाकडील तातडीने जयभवानी हॉटेल दत्तनगर येथून आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

आरोपींनी गुन्हयात वापरलेली दुचाकी आणि चोरलेला मोबाइल असा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, एसीपी नंदीनी वग्यानी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे एपीआय सी.बी. बेरड, उपनिरीक्षक बापु खुटवड, बजरंग पवार, संजय गायकवाड अमोल पवार, निलेश शिवतरे, महेश मंडलीक नवनाथ शिंदे, सागर कुंभार, सागर सुतकर, विशाल वाघ यांनी केली.

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments