Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजड्रग रॅकेटचा तपास एनआयए, एनसीबीकडेहस्तांतरित करण्याच्या हालचालींना वेगः पुणे पोलिसांनी केला...

ड्रग रॅकेटचा तपास एनआयए, एनसीबीकडेहस्तांतरित करण्याच्या हालचालींना वेगः पुणे पोलिसांनी केला तपास स्वतःकडे ठेवण्याचा आग्रह

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आतापर्यंत पुणे, कुरकुंभ, सांगली आणि दिल्ली येथे छापेमारी करत तब्बल ३ हजार ६०० कोटींचे सुमारे १८०० किलो मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ जप्त केला. या प्रकरणातविविध देशांत हे एमडी ड्रग पाठवण्यात आल्याचेतपासात निष्पन्न झाले आहे.

त्यामुळे या गुन्ह्यातील आंतरराष्ट्रीय रॅकेट उघडकीस आणण्यासाठी पुणेपोलिसांचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

मात्र, यामध्ये देशविरोधी कारवायांसाठी अमली पदार्थविक्रीच्या पैशांचा वापर झाला आहे का? या दृष्टीनेतपास करण्यासाठी हे प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) किंवा मोठ्या प्रमाणात ड्रग मिळून आल्याने हा तपास नार्कोटिक कंट्रोल ब्युरो (एनसीबी) यांच्याकडे हस्तांतरित करण्याच्या वेगवान हालचालीराष्ट्रीय पातळीवर सुरू आहेत. मात्र, पुणे पोलिसांनीयावर आक्षेप घेत हा तपास स्वतःकडे ठेवण्याचा आग्रहपोलिस महासंचालकांकडे केला आहे, अशी माहितीसूत्रांनी दिली.

अमली पदार्थांच्या व्यवहारात आंतरराष्ट्रीय संघटितगुन्हेगारी टोळ्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. अंडरवर्ल्डमधील अमली पदार्थाशी संबंधित नेमकेकोणते गुन्हेगार या प्रकरणात सहभागी आहेतयाचीदेखील खातरजमा करण्यात येत आहे. याप्रकरणाचा मास्टरमाइंड मूळचा इंग्लंडचा रहिवासी असलेला ऊर्फ संदीप धुनिया हा असल्याचे सुरुवातीला सांगण्यात येत होते.

धुनियाची गर्लफ्रेंड पहायची अर्थिक व्यवहारः ड्रग रॅकेटमधील पैशांचा आर्थिक व्यवहार पाहण्याचेकाम धुनिया याची गर्लफ्रेंड पाहत असल्याचे काही पुरावे पोलिसांना मिळून आले आहेत. त्यानुसार तिचा शोधविविध ठिकाणी घेण्यात येत आहे. संदीप धुनिया हा या प्रकरणातला एक मोहरा असून त्याच्या पाठीमागे नेमकाकोणाचा वरदहस्त आहे याबाबतची खातरजमादेखील पोलिसांकडून करण्यात येत आहे.

इंग्लंडसोबत इतर दोनदेशांत ड्रग गेल्याचा संशय

दिल्लीतून हे ड्रग लंडन येथे पाठवण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळेइतर कोणत्या देशात ड्रग पाठवले गेलेयाबाबत पोलिस तपास करत असतानासिंगापूर आणि दुबई या देशातदेखीलड्रग काही प्रमाणात पाठवण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यादृष्टीने पुरावे गोळा करण्याचे कामपोलिसांकडून करण्यात येत आहे.

न्यायाधीशांची पोलिस मुख्यालयात येत मालाची पाहणी

पुणे पोलिसांनी दिल्ली येथून कुरिअरकंपनीतून संदीप राजपाल कुमार, दिवेशचरणजित भुतानी, संदीप हनुमानसिंगयादव, देवेंद्र रामफुल यादव यांना अटककेली आहे. शुक्रवारी सदर आरोपींनान्यायमूर्ती अमृत बिराजदार यांच्यासमोरहजर करण्यात आले. या वेळीपोलिसांनी न्यायालयास माहिती दिलीकी, आरोपींच्या ताब्यातून दिल्लीतून आतापर्यंत तब्बल ९७० किलो एमडीड्रग जप्त करण्यात आले आहे.

न्यायालयाने सदर आरोपींची २मार्चपर्यंत पोलिस कोठडीत परवानगीकेली आहे. पोलिसांनी जप्त केलेले ड्रगहे न्यायालयात मोठ्या प्रमाणात मालनेणे शक्य नसल्याने पोलिसमुख्यालयात एका हॉलमध्ये सर्व ड्रगपंचनाम्यासाठी ठेवण्यात आले होते. न्यायाधीशांनी सदर ठिकाणी येऊनसंबंधित मालाची पाहणी केली.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments