Friday, April 19, 2024
Homeक्राईम न्यूजड्रग रॅकेटः दोघांविरोधात लूकआऊट नोटीस जारी, दोन मुख्य सूत्रधारही परदेशात पळून जाण्याच्या...

ड्रग रॅकेटः दोघांविरोधात लूकआऊट नोटीस जारी, दोन मुख्य सूत्रधारही परदेशात पळून जाण्याच्या तयारीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आंतरराष्टीयड्रग रॅकेट उध्वस्त केल्यानंतर त्याचा मुख्य सूत्रधार भारतीय वंशाचा ब्रिटनचा नागरिकसंदीप धुनिया नेपाळमार्गे परदेशात फरार झाला. त्याच्या शोधार्थपोलिसांनी लूक आऊट आणि रेड कॉर्नर नोटीस काढली. मात्र, दरम्यानच्या तपासात ड्रग रॉकेटमध्ये तीनमुख्य सूत्रधार निष्पन्न झाले आहेत. यातीलदोघे मुख्य सूत्रधारही परदेशात पळूनजाण्याच्या तयारीत आहेत. यामुळे त्या दोघांविरुद्धही पुणे पोलिसांनी तातडीने लूक आऊट कॉर्नर नोटीस शनिवारी जारी केली.

गुन्हे शाखेने पुण्यात विश्रांतवाडी, सांगलीतकुपवाड आणि दिल्लीमध्ये छापे टाकूनतब्बल ३ हजार ६०० कोटी रुपयांचे मेफेड्रानेजप्त केले. ही राज्यातील आजवरचीसर्वाधिक मोठी कारवाई आहे. याचे धागेदोरेपरदेशापर्यंत गेल्याचेही निष्पन्न झाले. दरम्यान, रॅकेटचा मुख्य सुत्रधार ड्रग आणिमॉड्युलरचा प्रमुख संदीप धुनिया हा ड्रगच्याव्यवसायातील हाय प्रोफाइल गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यावरराज्यामध्ये ५ गुन्हे दाखल आहेत. तरब्रिटनमध्येही गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्नझाले आहे.

हे गुन्हे ड्रग संदर्भात असल्याचीशक्यता आहे. त्याची माहिती युध्द पातळीवरघेतली जात आहे. त्याचे वास्तव्यपाटणा (बिहार) आणि महाराष्ट्रात जास्तप्रमाणात होते. कारवाईच्या भीतीने तोपरदेशात गेला. त्याच्या सोबत इतर तीनजणांकडे ड्रग रॅकेटची सूत्रे असल्याचेलक्षात येताच दोघांचाही शोध घेण्यात येत आहेत. यातील मुंबईतील रहिवासी एकआरोपी मुंबई-पुणे या दोन शहरांच्याडील्समध्ये सहभागी होता. या दोन शहरातूनतो रॅकेटची जबाबदारी संभाळत होता. येथूनतो दिल्लीला माल पाठवत होता.

दिल्लीतूनजवळपास हजार किलो मेफड्रोन हस्तगतकरण्यात आले. हे मेफेड्रोन दिल्लीवरूनकुरिअरच्या माध्यमातून ब्रिटनला जाणारहोते. मात्र या आरोपीच्या मुलाचे लग्न असल्याने त्याने कुरिअर पाठवण्यास उशीरकेला. यामुळे पुणे पोलिसांच्या हाती मोठेघबाड लागू शकले. आंतरराष्ट्रीय ड्रगरॅकेटच्या या सुत्रधारांचा पुणे पोलिस कसूनशोध घेत आहेत. दरम्यान, काही महिन्यांपूर्वीपुण्यातील ससून रुग्णालयातून ड्रग रॅकेटचालवत असल्याने ललित पाटील याला अटक करण्यात आली होती. त्यानंतरनाशिकसह छत्रपती संभाजीनगर येथेहीमोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ आढळून आल्याने खळबळ उडाली होती.

ड्रग तयार करण्याचे ज्वलनशील रसायन जप्त

पुणे पोलिसांनी कुरकुंभ एमआयडीसीतीलअर्थ केम लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड याकंपनीत छापेमारी करत ड्रगचा कारखानाउघडकीस आणला. या प्रकरणात पोलिसांनीमोठ्या प्रमाणात एमडी पदार्थ जप्त केले आहे. त्याचसोबत सदर कारखान्यातून पंचनामाकरून ३० लिटरचे प्रत्येकी दोन बॅरल मधीलड्रग तयार करण्याचे ६० लिटर ब्रोमीन नावाचेज्वलनशील रसायन पंचनामा करून हस्तगतकेले आहे. सदर कारखाना करून पोलिसांनीत्या ठिकाणी बंदोबस्त देखील तैनात केलाअसल्याचे सांगण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments