Friday, April 19, 2024
Homeक्राईम न्यूजड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे – अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने लोहगावमधील गोदामातून मेफेड्रोनचा (एमडी) साठा इतरत्र हलविल्याचा संशय आहे. त्याच्याकडे कसून चौकशी करण्यात येत असून, मेफेड्रोनचा आणखी साठा पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.

अमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यातील आरोपी हैदर शेखने विश्रांतवाडीमध्ये तीन गोदामे भाडेतत्त्वावर घेतली होती. त्यापैकी एका गोदामातून ७५० ग्रॅम तर भैरवनगरमधील दोन गोदामांमधून ५५ किलो एमडी जप्त करण्यात आले होते. त्यावेळी सुनील बर्मनने आरोपी अशोक मंडलच्या मदतीने लोहगावमध्ये गोदाम भाडेतत्त्वावर घेतले होते.

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी विश्रांतवाडीमध्ये छापा टाकल्यानंतर बर्मनने लोहगावमधील गोदामामधून एमडीचा साठा इतरत्र हलवला होता. याबाबत बर्मनकडे चौकशी करण्यात येत आहे. लोहगाव येथील गोदामाचा पंचनामा करण्यात आला आहे. या गोदामामधून ७५ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले आहे.

या गोदामातील आणि विश्रांतवाडीतील गोदामातील कच्च्या मालाचे ड्रम सारखेच आहेत. त्यामुळे बर्मनकडून एमडीचा आणखी साठा मिळण्याची शक्यता आहे. बर्मनला हिंदी फारशी बोलता येत नाही. त्यामुळे बंगाली भाषा बोलणाऱ्या दुभाषीच्या मदतीने चौकशी करण्यात येत असल्याचे गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांनी सांगितले.

पब्जमध्ये एमडी पुरविणारे विक्रेते रडारवर

पुणे शहर ड्रगमुक्त करण्याबाबत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी आदेश दिले आहेत. शहरातील काही पब्ज आणि हॉटेल्समधील पार्त्यांमध्ये एमडी आणि इतर अमली पदार्थ विक्री केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. अशा ठिकाणी अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या विक्रेत्यांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केल्याची माहिती सहायक आयुक्त सुनील तांबे यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments