Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजड्रग्जकांड: 14 कोटींचे कर्ज फेडण्यासाठी भीमाजीसाबळे उतरला एमडी ड्रग निर्मितीमध्ये, एमडी प्रकरणात...

ड्रग्जकांड: 14 कोटींचे कर्ज फेडण्यासाठी भीमाजीसाबळे उतरला एमडी ड्रग निर्मितीमध्ये, एमडी प्रकरणात इंग्लंडचा ‘सॅम’ मास्टरमाइंड

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

आतापर्यंत साडेतीन हजार कोटींचे एमडीड्रग जप्त केल्याने देशभरात खळबळउडाली आहे. या गुन्ह्याच्या चौकशीत अमली पदार्थांचा गुन्हा दाखल असलेला ‘सॅम’ नावाचा इंग्लंडचा आरोपी हामास्टरमाइंड असून आफ्रिकेतीलटांझानिया देशाचा ‘ब्राऊन’ नामक आरोपीहा त्याच्या संपर्कात आल्यावर त्यांनीयेरवडा कारागृहात हैदर शेख, वैभव मानेयांच्या मदतीने ड्रग निर्मीितीचे उत्पादनघेण्याचे ठरवले.

सॅम याच्या माध्यमातूनडोंबिवलीचा केमिकल तज्ज्ञ युवराजभुजबळ हा संपर्कात आला व त्याचावापर करून सॅमने कुरकुंभएमआयडीसीतील भीमाजी साबळे याच्याकंपनीत ड्रग उत्पन्न घेण्याचे निश्चितकेले. साबळे याच्यावर कंपनीतीलकामाचे तब्बल १४ कोटी रुपयांचे कर्जझाले होते. त्यामुळे झटपट पैसेमिळवण्यासाठी तो ड्रग निर्मितीतउतरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दर आठवड्याला तब्बल ३०० किलोड्रग्ज निर्मितीची क्षमता कारखान्यातनिर्माण झाली होती. दरम्यान, याप्रकरणात आतापर्यंत ५ जणांना अटककरण्यात आली असून सांगलीतून एकालापकडले आहे, तर दिल्लीतून एकाचाशोध सुरू आहे. युवराज भुजबळ हाडोंबिवलीमधील आर अँड डी प्रा. लि. याकंपनीत केमिकल तज्ज्ञ म्हणून काम करतहोता. या कंपनीत मागील सात ते आठ वर्षेकाम केल्यानंतर तो सॅम या आरोपीच्यासंपर्कात आल्याचेही समोर आले.

सॅमच्या माध्यमातून तो साबळे यासकुरकुंभ येथे कंपनीत जाऊन भेटला. त्यानेड्रग बनवण्याचा फार्म्युला त्यास देऊनसदरचे उत्पादन घेण्याचे सांगितले. त्याकरिता आतापर्यंत त्याने साबळे यास ८लाख रुपये देखील दिले आहे. सॅम हानेमके किती उत्पादन पाहिजे हे सांगतहोता. त्याप्रमाणे साबळे यास उत्पादनाचीआ र्डर दिली जात होती. प्रत्येकडिलिव्हरीमागे लाखो रुपये मिळत असल्याने साबळे हा देखील ड्रगउत्पादनात सक्रिय झाला होता.

हवालामार्ग पैशाची देवाण-घेवाण

या घटनेने ड्रग तस्करीचे रॅकेट देशभरात किती मोठ्याप्रमाणात पसरले याचा अंदाज येऊ लागला आहे. मेफेड्रॉन विक्रीतून मोठ्या प्रमाणात पैशाचीदेवाण-घेवाण होत असल्याने हे सर्व पैसे हवालामार्गेपाठवण्यात येत होते, असा संशय तपास यंत्रणांना असून त्याचा तपास करण्यात येत आहे. इतक्या मोठयाप्रमाणात आ र्डर कोण देत होते, त्याचा वापर नेमका कुठेकुठे केला गेला, त्यासाठीचे आर्थिक रसद कोणी वकिती पुरवली याबाबत देखील चौकशी करण्यात येत आहे. या रकमेचा नेमका विनियोग कशाप्रकारे झाला हेदेखील तपासण्यात येत आहे. पुणे पोलिसांनी बुधवारीन्यायालयात हजर केलेल्या आरोपींच्या तपासात आतापर्यंत पुण्यातून १ हजार ३९० कोटी ८ लाख ६८ हजार रुपयांचे एकूण ७१८ किलो सात ग्रॅम एमडी जप्तकेल्याची माहिती दिली आहे.

टेम्पो चालक ठरले महत्त्वपूर्ण दुवा

पुणे पोलिसांनी सुरुवातीला या प्रकरणात वैभव माने व त्याचा वाहनचालक या दोघांना अटक केली व त्यांच्या ताब्यातून साडेतीन कोटींचेएमडी जप्त केले. त्यानंतर त्यांच्या चौकशीत हैदर शेख याचे नावनिष्पन्न करून विश्रांतवाडी येथील गोदाम छाप्यात ५५ किलो एमडीजप्त केले. त्यानंतर सदर मालाची वाहतूक करणाऱ्या तीन टेम्पोचालकांना शोधून काढत त्यांच्याकडे चौकशी केली. त्यात कुरकुंभ, सांगली व दिल्ली येथील ठिकाणांची माहिती पोलिसांना मिळाली. टेम्पो चालकांच्या मदतीने कुरकुंभ येथून ६६३ किलो ८०० ग्रॅम एमडी, दिल्लीतून ९७० किलो एमडी व सांगलीतून १४० किलो एमडी जप्तकरण्यात आलेले आहे. पोलिसांच्या पथकासोबत विमानाने टेम्पोचालक देखील दिल्लीला तपास कामासाठी रवाना करण्यात आला. दिल्लीत जप्त करण्यात आलेला माल सुरक्षित पुण्यात आणण्यासाठी १ डीसीपीसह १४ पोलिसांचे पथक व दोन क्यूआरटी टीम दिल्लीसपाठविण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments