इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
गुजरातः गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे विमान क्रॅश झाले. हे विमान अहमदाबादहून लंडनकडे जात होते. या विमानात २४२ प्रवासी होते. या अपघातात विमानातील २४१ जणांचा मृत्यू झाला आहे.
‘इंडिया टुडे’ ने दिलेल्या माहितीनुसार, या भीषण अपघातातून एका प्रवाशाचा जीव वाचला आहे. त्यांचे नाव रमेश विश्वास कुमार असल्याचे सांगितले जात आहे.
रमेश कुमार म्हणाले…
रमेश कुमार यांनी सांगितले, “जेव्हा मी डोळे उघडले, तेव्हा आजूबाजूला फक्त मृतदेहच दिसत होते. मी खूपच घाबरलो. त्यानंतर मी उभा राहिलो आणि फक्त पाळायला लागलो.”
ते पुढे म्हणाले, “टेकऑफ झाल्यानंतर साधारण ३० सेकंदांनी एक जोरदार आवाज आला आणि लगेच विमान जमिनीवर आदळले. सर्वकाही इतकं वेगात घडलं की काही कळण्याआधीच सगळं संपलं.”
या अपघातात रमेश यांच्या छातीला, डोळ्यांना आणि पायांना गंभीर दुखापत झाली आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची सीट 11A होती. अशी माहिती अहमदाबादचे पोलीस आयुक्त जी.एस. मल्लिक यांनी दिली आहे.