Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजडॉ. सायरस पूनावाला यांना भारतरत्न पुरस्कार द्यावाः शरद पवार यांची मागणी;...

डॉ. सायरस पूनावाला यांना भारतरत्न पुरस्कार द्यावाः शरद पवार यांची मागणी; वनराईतर्फे ‘स्व. डॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार’ प्रदान

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

आज जगातील पाच पैकी तीन व्यक्ती सायरस पूनावाला यांच्या सिरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली लस घेत आहेत. पूनावाला यांच्यामुळेच भारत कोरोना सारख्या संकटातून बाहेर पडू शकला, त्यांचे वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील योगदान लक्षात घेता केवळ पद्मभूषण पुरस्कारापुरते त्यांना मर्यादित न ठेवता त्यांच्या कार्याचा योग्य सन्मान करण्यासाठी केंद्र सरकारने त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे अशी भावना माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली.

वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदानासाठी डॉ. सायरस पुनावाला यांना वनराई फाउंडेशन तर्फे शरद पवार यांच्या हस्ते ‘स्व. डॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार श्रीनिवास पाटील, वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया, वनराई फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी, कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा, वनराईचे विश्वस्त गणपतराव पाटील, सचिव निलेश खांडेकर, विश्वस्त रोहिदास मोरे, सचिव अमित वाडेकर आदी यावेळी उपस्थित होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सायरस पूनावाला यांना शुभेच्छा दिल्या.

शरद पवार म्हणाले, डॉ. मोहन धारिया यांनी आपल्या राजकारण आणि समाजकारणाने देशाला वेगळी दिशा दाखवून दिली, राष्ट्र प्रथम ही मोहन धारिया यांचे विचारसरणी होती. सिरम इन्स्टिट्यूट हे एक प्रकारे त्यांच्याच विचारांवर वाटचाल करून केवळ देशाचाच नव्हे तर जगातील प्रत्येकाचा विचार करून लस निर्मिती करत आहे. आज जगातील पाच व्यक्तींपैकी तीन व्यक्ती सिराम इन्स्टिट्यूटने तयार केलेली लस घेत आहेत, यावरूनच सिरम इन्स्टिट्यूट चे जागतिक स्तरावरील योगदान आपल्याला लक्षात येऊ शकते, त्यांनी दिलेले हे योगदान लक्षात घेता सायरस पूनावाला यांचे कर्तृत्व केवळ पद्मभूषण पुरस्काराने गौरवित न करता त्यांना देशातील सर्वोच्च भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे.

सायरस पूनावाला म्हणाले, डॉ. मोहन धारिया हे जेव्हा देशाच्या नियोजन समितीचे उपाध्यक्ष होते त्यावेळी आमच्या सिरम इन्स्टिट्यूट च्या वाटचालीमध्ये त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले होते, त्यानंतरही त्यांनी श्रीराम इन्स्टिट्यूटला वेळोवेळी योग्य मार्गदर्शन केले, सिरम इन्स्टिट्यूट ही जगातील सर्वाधिक लस निर्माण करणारी संस्था व्हावी असे माझे स्वप्न नव्हते, तर आज कोट्यावधी लहान मुलांचे जीव आमच्या संस्थेने तयार केलेल्या लसीमुळे वाचत आहेत ही एक प्रकारे समाधानाची बाब आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments