Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वाहतुकीत बदल

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वाहतुकीत बदल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रविवारी (ता. १४) शहरातील पुणे स्टेशन, अरोरा टॉवर कॅम्प, विश्रांतवाडी आणि दांडेकर पूल परिसरात नागरिक अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर येतात. त्यामुळे मिरवणूक मार्गावरील वाहतूक आवश्यकतेनुसार इतर पर्यायी मार्गांनी वळविण्यात येणार आहे. हा बदल १३ एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजल्यापासून १४ एप्रिल रोजी रात्री दोन वाजेपर्यंत राहील. वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी केले आहे.

वाहतुकीतील बदल –

शाहीर अमर शेख चौकाकडून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक शाहीर अमर शेख चौकातून वळविण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग- शाहीर अमर चौकाकडून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहने आरटीओ चौक जहाँगीर चौकमार्गे इच्छित स्थळी जातील.

जीपीओ चौकातून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक जीपीओ चौकातून वळविण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग- जीपीओ चौकातून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक किराड चौक नेहरू मेमोरिअल चौकमार्गे इच्छित स्थळी जाईल.

पुणे स्टेशन चौकातून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक पुणे स्टेशन चौकातून वळविण्यात येणार आहे.

पर्यायी मार्ग- पुणे स्टेशन अलंकार चौकमार्गे इच्छितस्थळी.

नरपतगीर चौकाकडून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक नरपतगीर चौकातून वळविण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग – नरपतगीर चौक-१५ ऑगस्ट चौक- कमला नेहरू हॉस्पिटल- पवळे चौक – कुंभारवेस चौक मार्गे इच्छितस्थळी जातील.

बॅनर्जी चौक बॅनर्जी चौकाकडून शाहीर अमर शेख चौकाकडे जाणारी वाहतूक बॅनर्जी चौकातून वळविण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग- बॅनर्जी चौकाकडून पॉवर हाऊस चौक, नरपतगीर चौक, १५ ऑगस्ट चौक, कमला नेहरू हॉस्पिटल, पवळे चौक, कुंभारवेस चौकातून इच्छितस्थळी जातील.

ससून रुग्णालयातील अत्यावश्यक रुग्णांसाठी डेड हाऊसच्या शेजारील प्रवेशद्वारातून रुग्णवाहिकांना प्रवेश देण्यात येणार आहे.

वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था –

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांसाठी आर.टी.ओ. शेजारी एस.एस.पी.एम.एस. मैदान (दुचाकी व चारचाकी वाहने), पुणे स्टेशन येथील तुकाराम शिंदे वाहनतळ (दुचाकी व चारचाकी वाहने) आणि ससून कॉलनी येथे (दुचाकी वाहने) अशी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. अरोरा टॉवर चौकात येणाऱ्या वाहनचालकांनी तारापोर रस्ता, ईस्ट स्ट्रीट व अन्य रस्त्यांवरील पे-अण्ड पार्कच्या ठिकाणी वाहने पार्क करावीत.

दांडेकर पूल परिसरात वाहतूक व्यवस्थेत बदल-

स्वारगेटकडून सिंहगड रस्त्याला जाणारी वाहतूक : सावरकर चौक ते थोरले बाजीराव पेशवे पथ ते कल्पना हॉटेल चौक ते ना. सी. फडके ते मांगीरबाबा चौक ते सेनादत्त पोलिस चौकी चौक ते बालशिवाजी ते आशा हॉटेल चौकातून सिंहगड रस्त्याकडे.

सिंहगड रस्त्याकडून स्वारगेटकडे जाणारी वाहतूक : आशा हॉटेल चौकातून डावीकडे वळून ते बालशिवाजी ते सेना दत्त पोलिस चौकी चौक ते मांगीरबाबा चौक ते ना. सी. फडके चौक ते कल्पना हॉटेल चौक ते सणस पुतळा चौक सोयीनुसार.

शास्त्री रस्त्याकडून येणारी वाहतूक : सेनादत्त चौकाकडून येणारी वाहने डावीकडे मांगीरबाबा चौकातून ना. सी. फडके चौकाकडे पुढे जातील.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments