Thursday, March 20, 2025
Homeक्राईम न्यूजडॉ. नीलम गोन्हे यांच्या माजी ओएसडीसह तिघांवर गुन्हा दाखल; नेमकं कारण काय?

डॉ. नीलम गोन्हे यांच्या माजी ओएसडीसह तिघांवर गुन्हा दाखल; नेमकं कारण काय?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मुंबई : विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांच्या माजी ओएसडीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नागिरीतील एका तरुणाची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांकडून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 6.50 लाख रुपये उकळण्यात आल्याचा आरोप या तिघांवर करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आरोग्य खात्यात नोकरी देण्याच्या बहाण्याने रत्नागिरी जिल्ह्यातील तरुणाकडून जवळपास 6.50 लाख रुपये उकळण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. शनिवारी माहीम पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सचिन चिखलीकर, चारुदत्त तांबे, तेजस तांबे अशी आरोपींची नावे आहेत. त्यापैकी सचिन मंत्रालयात ओएसडी म्हणून नियुक्त होता, तर फसवणूक झालेला तरुण निवृत्त पोलिसाचा मुलगा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोहे यांच्यासोबत आरोपी सचिन हा 2021 मध्ये रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी आला होता. त्यावेळी तरुणाच्या कुटुंबीयांनी त्याची भेट घेतली होती. आरोग्य खात्यात लिपिक म्हणून नोकरी मिळवून देण्यासाठी त्याने दोन लाख स्वीकारले होते. मात्र आरोग्य खात्यातील रिक्त पदांसाठी होणारी परीक्षा रद्द झाल्यानंतर सचिनने या कुटुंबाची भेट तांबे यांच्याशी घडवली होती.

तांबे यांनी रेल्वेत, कृषी खात्यात नोकरी मिळवून देतो, असे सांगत तरुणाकडून 14 लाखांची मागणी केली होती. त्यापैकी 7 लाख रुपये आगाऊ घेण्यात आले होते. मात्र नोकरी मिळाली नसल्याने कुटुंबाने पैशांसाठी तगादा लावला. त्यातील अडीच लाख रुपये तांबेने परत केल्याच तक्रारदाराने सांगितले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments