Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजडेक्कन परिसरात विद्यार्थ्याला बेदम मारहाण

डेक्कन परिसरात विद्यार्थ्याला बेदम मारहाण

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे – विद्यार्थ्याला बेदम मारहाण करून त्याची विवस्त्रावस्थेतील चित्रफीत सोशल मीडियावर प्रसारित केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना डेक्कन परिसरात झेड ब्रिजजवळ नदीपात्रात घडली.

या प्रकरणी १६ वर्षीय विद्यार्थ्याच्या आईने डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अन्सू शर्मा (वय १९, रा. मंडई) याच्यासह चारजणांविरुद्ध पोक्सो आणि आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शर्मा आणि तक्रारदार महिलेचा मुलगा यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्यामुळे त्या अल्पवयीन मुलाने शर्माला मारहाण करण्यासाठी काही मुलांना पाठविले, असा आरोपीचा समज झाला. त्यावरून शर्मा आणि त्याच्या तीन साथीदारांनी मुलाला बुधवारी (ता. १०) मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास झेड ब्रिजजवळ नदीपात्रात नेले.

तेथे त्याला पहाटे साडेतीन वाजेपर्यंत कमरेच्या पट्ट्याने आणि बांबूने मारहाण करून जखमी केले. त्यानंतर आरोपींनी त्याला विवस्त्र करून मोबाईलवर चित्रीकरण केले. ती चित्रफीत सोशल मीडियावर प्रसारित केली. तसेच, पोलिसांत तक्रार दिल्यास व्हॉटसअॅप ग्रुपवर चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी दिली. याबाबत मुलाच्या आईने गुरुवारी रात्री पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास डेक्कन पोलिस करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments