Tuesday, April 29, 2025
Homeक्राईम न्यूजडंपर टू व्हीलरच्या अपघातात २४ वर्षीय युवकाचा मृत्यू, मलठण येथील दुर्घटना

डंपर टू व्हीलरच्या अपघातात २४ वर्षीय युवकाचा मृत्यू, मलठण येथील दुर्घटना

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

रांजणगाव गणपती मलठण रांजणगाव रोडवर मलठण येथे डंपरने दिलेल्या धडकेत मोटारसायकलवरील एक जण मृत्युमुखी पडला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. संग्राम नारायण गोपाळे वय-२४ वर्ष गुणवरे, ता. पारनेर जि. अहिल्यानगर असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरेश सुखदेव चत्तर वय. ४७ वर्ष रा. म्हसे खु ता. पारनेर जि. अहिल्यानगर यांनी डंपर क्र. एम. एच. ४५ – ए. एफ. ७८८५ मधील चालकाविरोधात फिर्याद दिली आहे.

सुरेश चत्तर यांचा भाचा संग्राम नारायण गोपाळे (वय. २४ वर्ष) व त्याचा चुलता अतुल कचरु गोपाळे दोन्ही रा. गुणवरे, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर हे पहाटे साडेपाचला रिलायन्स वेअर हाउस कंपनी शिक्रापुर येथे कामाला जाणेसाठी हिरो स्पेंल्डर कपंनीच्या मोटार सायकलवरुन मलठण ते रांजणगाव रोडवरुन मलठण येथून चालले असताना डंपर क्र. एम. एच ४५ ए.एफ ७८८५ मधील चालकाने त्याच्या ताब्यातील डंपर भरधाव वेगात चालवुन मोटार सायकलला धडक दिली. त्यात अतुल कचरू गोपाळे रा. गुणवरे ता पारनेर जि. अहिल्यानगर हा गंभीर जखमी झाला तर संग्राम नारायण गोपाळे वय. २४ वर्ष रा. गुणवरे ता पारनेर जि. अहिल्यानगर यांचा मृत्यू झाला.

अपघातातील जखमीना कोणतीही मदत न करता तेथुन डंपर घेवुन चालक पळुन गेला असुन यासंदर्भात अधिक तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार वारे करीत आहेत

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments