Saturday, July 13, 2024
Homeक्राईम न्यूजडंपरच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू; सिंहगड रोड परिसरातील घटना

डंपरच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू; सिंहगड रोड परिसरातील घटना

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

धायरी (पुणे) : पुणे शहरातील अपघाताचे सत्र थांबायचं नाव घेईना. अवजड डंपरच्या धडकेत एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास सिंहगड रस्ता परिसरातील नांदोशी येथे घडली आहे. संजय राजाराम बाबर (वय-५० वर्षे, रा. जावळी जिल्हा सातारा) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याप्रकरणी डंपरचालक मल्लिकार्जुन नीळकंठराव बिराजदार (वय-३९ वर्षे, रा. किरकटवाडी, सिंहगड रस्ता, मूळगाव, गुलबर्गा) याला ताब्यात घेतले असल्याची माहिती हवेली पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन वांगडे यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, संजय बाबर हे नांदोशी येथील मनन आश्रमजवळ असणाऱ्या एका विहिरीचे काम करण्यासाठी आले होते. दरम्यान ते नांदोशी येथील मुख्य रस्त्यावरून चालत जात असताना बाजूने चाललेल्या डंपरने अचानकपणे डाव्या बाजूला आपले वाहन वळवले.

यावेळी डाव्या बाजूला चालत जाणारे संजय बाबर हे चालकाला दिसले नसल्याने त्यांना डंपरची जोरदर धडक बसली. या धडकेत बाबर यांचा जागीच मृत्यू झाला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments