Thursday, November 30, 2023
Home क्राईम न्यूज ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड, प्रत्येकी 21,500 हजार रुपयांचा बोनस...

ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड, प्रत्येकी 21,500 हजार रुपयांचा बोनस जाहीर

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

ठाणे : महानगपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून, कर्मचाऱ्यांना 21500 रूपये दिवाळी बोनस म्हणून जाहीर झाला आहे. ठाणे महानगरपालिकेकडून (Thane Municipal Corporation) आपल्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी सानुग्रह अनुदानामध्ये (Diwali Bonus) भरघोस 20 टक्के वाढ करण्यात आली आहे.

दिवाळी निमित्ताने शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर केला जातो. ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर करण्यात आला आहे. गेल्या वर्षी 18 हजार रुपये इतका बोनस दिला होता. तर या वर्षी यामध्ये 20 टक्के वाढ झाली असून 21 हजार 500 रुपये बोनस जाहीर करण्यात आला आहे. तसेच आशा सेविकांना यंदा 6000 रुपयांची भाऊबीज जाहीर करण्यात आली आहे. भाऊबीज आणि सानुग्रह अनुदानात भरघोस 20 टक्क्यांची वाढ करण्यात आल्याने आशा सेविका आणि ठामपा कर्मचारी वर्गाची दिवाळी गोड झाल्यामुळे आनंदाचे वातावरण असून त्यांनी आभार मानले आहेत.

यंदाच्या बोनसमध्ये 20 टक्क्यांची भरघोस वाढ आशा सेविकांना गेल्यावर्षी प्रथमच पाच हजार रुपयांची भाऊबीज जाहीर करण्यात आली होती. यंदा त्यात 20 टक्क्यांची भरघोस वाढ करण्यात आली आहे. तसेच, ठाणे महानगरपालिकेने सन 2021-22 साठी 18 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले होते. त्यातही 3500 रुपयांची म्हणजेच 20 टक्क्यांची भरघोस वाढ करण्यात आली आहे. 2022-23 या वर्षासाठी 21500 रुपये देण्यात येणर आहे. धनत्रयोदशीच्या आधी ही भाऊबीज आणि सानुग्रह अनुदान संबंधितांच्या बँक खात्यात जमा करण्याचे स्पष्ट आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्या सोबत सानुग्रह अनुदानाची घोषणेमुळे ठामपा कर्मचारी यांनी आणि ठाणे मुन्सिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष यांनी दिवाळी गोड झाल्यामुळे आयुक्तांचे आभार मानले आहेत.

कर्मचाऱ्यांचा जल्लोष सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस जाहीर करण्यात आला आहे. बोनसच्या घोषणेनंतर कर्मचाऱ्यांनी महापालिका आयुक्तांचे आभार मानत ढोल ताशाच्या गजरात जल्लोष केला.

कल्याण डोंबिवली मनपाच्या कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून (Kalyan Dombivali Municipal Corporation) आपल्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी सानुग्रह अनुदानामध्ये वाढ करण्यात आली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त वगळता सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस जाहीर झाला आहे. गेल्या वर्षी 16 हजार 500 रुपये इतका बोनस दिला होता. तर या वर्षी यामध्ये वाढ झाली असून 18 हजार 500 रुपये बोनस जाहीर करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

आंबेगाव तालुक्यातील अवसरी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) अवसरी आयेगाव तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या जवसरी खुर्द, अवसरी बुद्दक, गावडेवाडी या परिसरात पाऊस झाला. अवसरी खुर्द येथे साडेतीन...

Recent Comments