इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : आगामी मनपा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेने” ऑपरेशन टायगर” अंतर्गत ठाकरे गटातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात गळाला लावले.. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला.. आता पक्षातील होणारी गळती थांबवण्यासाठी ठाकरे गट अॅक्शन मोडवर आला असून येत्या 20 आणि 25 तारखेला ठाकरे गटाच्या आमदार-खासदारांची बैठक होणार आहे.. या बैठकीत खासदार-आमदारांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत..
राज्यात शिवसेनेच्या शिंदे गटाने सुरू केलेल्या ऑपरेशन टायगरची धास्ती आता ठाकरे गटाला बसली असून पक्ष एकसंध ठेवण्याच मोठ आव्हान आता ठाकरे गटापुढे उभा राहिला आहे.. या पार्श्वभूमीवर आता येत्या 20 तारखेला खासदार आणि 25 तारखेला आमदारांना बैठकीला उपस्थित राहण्याचे शिवसेना भवन येथून आदेश देण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.. या बैठकीतून ठाकरे गट मोठी रणनीती आखण्याच्या मार्गावर आहे.. दरम्यान विधानसभेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदारांची बैठक होणार असून यां बैठकीत विरोधी पक्ष नेत्याचे नाव निश्चितीबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे..
दरम्यान सेनेत बंड झाल्यावर ही निष्ठावान म्हणून मानल्या जाणाऱ्या राजन साळवी यांनी ठाकरेंची साथ कधी सोडली नव्हती.. मात्र दोन दिवसांपूर्वी साळवी यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिंदे गटाचा रस्ता पकडला.. त्यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी ही ठाकरे गटाला रामराम केला.. शिंदे गट ठाकरेंचा एकेक आमदार फोडण्याच्या तयारीत असताना आता ठाकरे गट सक्रिय झाला असून बैठकीतून नाराज असलेल्या नेत्यांची मनधरणी केली जाणार आहे.. याआधी दिल्लीत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना आदित्य ठाकरे यांनी खासदारांची दिल्लीत बैठक घेतली होती. आता ठाकरेंच्या आमदार खासदारांची पुन्हा बैठक घेतली जाणार आहे.. आता या ठाकरे गटाच्या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे…