Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजट्रेडिंग मधून नफा मिळवून देण्याचा बहाणा: 19 लाख 50 हजारांची फसवणूक; भारती...

ट्रेडिंग मधून नफा मिळवून देण्याचा बहाणा: 19 लाख 50 हजारांची फसवणूक; भारती पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

बल्क मध्ये शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग केल्यास मोठ्या प्रमाणात नफा मिळेल असे सांगून एकाची 19 लाख 50 हजार 584 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी कौस्तुभ दिलीप पंडित (वय-41, आंबेगाव खुर्द) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार अर्जुन अग्रवाल, नालिझ लिम, ब्लॅक रॉक बिझनेस स्कुल व्हाटसऍप ग्रुप वापररकर्ते, विविध बँक धारकावर फसवणुकीसह आयटी ऍक्टच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 13 डिसेंबर 2023 पासून ते गुन्हा दाखल होईपर्यंतच्या काळात घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, आरोपींनी फिर्यादी कौस्तुभ पंडित यांना सुरुवातील व्हॉटसअप मेसेजच्या माध्यमातून ट्रेडिंग टिप्स दिल्या. यानंतर फिर्यादी यांना नफा करून दिला. यानंतर विश्वास संपादन फिर्यादी यांच्या इन्स्टिट्यूशनल खात्यावर रक्कम पाठवून बल्क ट्रेडिंग केल्यास भरघोस नफा मिळेल असे आमिष दाखवून फिर्यादी पंडित यांना ब्लॅक रॉक बिझनेस स्कुल व्हाटसऍप ग्रुप मध्ये ऍड करण्यात आले.

यानंतर ग्रुप मधील इतरांना चांगला नफा दिल्याचे भासवून फिर्यादी पंडित यांना एक ऍप डाऊनलोड करायला विविध बँक खात्यावर 19 लाख 50 हजार 584 रुपये पाठवायला सांगून फसवणूक केल्याचे फिर्यादत नमूद केले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) एस झिने करत आहेत.

महिलेची साडेतीन लाखांची फसवणूक

वीज पुरवठा खंडीत करण्याच्या बतावणीने सायबर चोरट्यांकडून फसवणुकीचे प्रकार वाढीस लागले आहेत. चोरट्यांनी पर्वती भागातील एका महिलेची साडेतीन लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ५५ वर्षीय महिलेने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी महिलेच्या मोबाइल क्रमांकाव सायबर चोरट्यांनी संदेश पाठविला होता. त्यात महावितरणमध्ये अधिकारी असून, तुमचे वीज बिल भरणे बाकी आहे. पैसे न भरल्यास वीज पुरवठा खंडीत करण्यात येईल, असा संदेश सायबर चोरट्यांनी पाठविला होता. त्यानंतर महिलेने संदेशातील क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा चोरट्यांनी महिलेला क्विक सपोर्ट अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले.

संबंधित अॅप डाऊनलोड करताना महिलेकडून बँक खात्याची माहिती घेण्यात आली. या माहितीचा गैरवापर करून चोरट्यांनी खात्यातून ऑनलाइन पद्धतीने तीन लाख ४९ हजार ६८० रुपये चोरले. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) एन गावित करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments