Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाल्याने एकाचा मृत्यूः आगीमुळे घरातील सिलेंडरचाही स्फोट, दुर्घटनेत 7 जण...

ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाल्याने एकाचा मृत्यूः आगीमुळे घरातील सिलेंडरचाही स्फोट, दुर्घटनेत 7 जण जखमी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

आळंदी नजीक सोळू या गावात रस्त्यावरील एमएसईबीच्या ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होऊन आजूबाजूच्या घरांना आग लागल्याची घटना घडली. यामुळे एका घरातील सिलेंडरचा स्फोट झाला असून, त्यात सातजण जखमी तर एकजण जखमी झाल्याची घटना घडली आहे. सर्व जखमींना नजीकच्या रुग्णालयामध्ये हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच, पिंपरी चिंचवड महापालिकेचे अग्निशमक दल, पोलीस अधिकारी दाखल झाले.

अग्निशामक दलाने माहिती दिली की, गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सोलू आळंदी मरकल रोड येथे स्पेसिपिक आलोय प्रा. लि मध्ये आग लागली होती. ही कंपनी सुमारे चार वर्षा पासून बंद स्थितीत आहे. असे स्थानिकांकडून समजले तसेच कंपनी व कंपनीच्या बाजूला असलेले ट्रान्सफॉर्मर याच्या दोन्ही बाजूने स्फोट होऊन आंदाजे शंभर मीटर परिसरात आगीच्या ठिणग्या उडाल्यामुळे कंपनी ही गावठाण परिसरातील असल्यामुळे गवताच्या गंजी, गुरांचा चारा तसेच गुरांना देखील हानी झाली. चार चाकी वाहने, दुचाकी वाहाने, तसेच घरांचे नुकसान झाल्याचे निर्शनास आले.

पीएमआरडीए अग्निशमन विभाग, पिंपरी चिंचवड अग्निशमन दल, आळंदी नगरपरिषद, पुणे महानगर पालिका अग्निशमन दल या अग्निशमन वाहनांच्या तात्काळ मदतीने आग लवकर आटोक्यात आणण्यात आली. तात्काळ मदत मिळाल्यामुळे बाजूला असलेल्या घरांना सुरक्षित करण्यात आले. आगीच्या ठिकाणी जखमी व्यक्ती झालेल्या व्यक्तींना पुढील उपचारासाठी ससून रुग्णांलयात पाठवण्यात आले.

आगीशी महावितरणचा संबंध नाही

आळंदी नजीकच्या सोळू गावात (ता. खेड) गुरूवारी महावितरणच्या वितरण रोहित्राचा स्फोट होऊन काही घरांना आग लागल्याची माहिती चुकीची आहे. या आगीशी काहीही संबंध नाही तसेच वीजबिलाच्या थकबाकीमुळे गेल्या सहा महिन्यांपासून संबंधित रोहित्राचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे असा खुलासा महावितरणकडून करण्यात आला आहे. महावितरणच्या चाकण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता विजय गारगोटे व सहायक अभियंता संदीप कुन्हाडे यांनी तातडीने सोळू येथे वीजयंत्रणेची पाहणी केली. यामध्ये घटनास्थळी असलेल्या 63 केव्हीए क्षमतेच्या रोहित्राचा प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारचा स्फोट झाल्याचे आढळून आले नाही. तसेच आग लागल्याचे देखील दिसून आले नाही. आग विझवल्यानंतरही हा रोहित्र सुस्थितीत असल्याचे आढळून आले. मात्र बाजूची भिंत पडल्याने रोहित्राचे वीजखांब वाकले आहेत. आणखी एक वस्तुस्थिती अशी आहे की, या रोहित्रावरून केवळ एका ग्राहकाला वीजजोडणी देण्यात आली आहे. मात्र संबंधित ग्राहकाचे वीजबिल थकीत असल्याने गेल्या सहा महिन्यांपासून या रोहित्राचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे सोळू येथील आगीशी महावितरणच्या रोहित्राचा कोणताही संबंध नसल्याचे घटनास्थळी केलेल्या प्राथमिक तपासणीत आढळून आले आहे.

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments