Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजट्रकच्या धडकेने महिलेसह सहावर्षीय बालिकेचा मृत्यू

ट्रकच्या धडकेने महिलेसह सहावर्षीय बालिकेचा मृत्यू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : भरधाव ट्रकने एका महिलेसह सहावर्षीय बालिकेला धडक दिल्यामुळे दोघींचा मृत्यू झाला. ही दुर्घटना नन्हे आंबेगाव परिसरातील भूमकर पुलाजवळ बाह्यवळण मार्गावर घडली. शीतल सिद्धराम पाटील (वय ४२) आणि अबोली सूरज शेटके (वय ६) अशी मृतांची नावे आहेत. या प्रकरणी रोहन सिद्धराम पाटील (वय १९, रा. नन्हे) याने सिंहगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यावरून ट्रकचालक पांडुरंग सुनील पिनाटे (वय २८, रा. तुगाव, ता. भालकी, जि. बिदर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रोहन, त्याची आई शीतल आणि भाची अबोली हे तिघेजण शनिवारी (ता. २७) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरला निघाले होते.

पाटील कुटुंबीय भूमकर पुलाजवळ रस्त्याच्या कडेला बसची वाट पाहत थांबले होते. शीतल यांनी भाची अबोलीला कडेवर घेतले होते. त्यावेळी भरधाव ट्रकचालकाने शीतल आणि अबोलीला धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान दोघींचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अस्मिता लाड करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments