इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
मुंबई : मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलाने ५७ व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी एडीआर दाखल केला असून, घटनेचा पुढील तपास सध्या पोलीस करत आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, ‘संबंधित अभिनेत्री आपला पती आणि मुलासह मुंबईतल्या कांदिवली परिसरातील एका सोसायटीत ५७ व्या मजल्यावर वास्तव्यास आहे. ज्या दिवशी मुलाने आत्महत्या केली. त्याआधी अभिनेत्रीने मुलास ट्यूशनला जाण्यास सांगितलं होतं. पण मुलाला ट्यूशनला जायचं नव्हतं. त्यामुळे त्याने रागाच्या भरात ५७ व्या मजल्यावरून उडी घेतल्याचं सांगितलं जात आहे.
संबंधित अभिनेत्री आणि तिच्या मुलाचे नाव पोलिसांकडून गुपित ठेवण्यात आले आहे. त्याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, ज्या अभिनेत्रींच्या मुलाने आत्महत्या केली आहे. ती अभिनेत्री गुजराती टीव्ही क्षेत्रातीलं मोठं नाव असल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, एका अभिनेत्रीच्या मुलाने ५७ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.