Sunday, December 10, 2023
Home क्राईम न्यूज ट्यूशनला जातो सांगून निघाला, बॅगेत पुस्तकांऐवजी काय भरलं?.. बेपत्ता मुलाचा पोलिसांनी कसा...

ट्यूशनला जातो सांगून निघाला, बॅगेत पुस्तकांऐवजी काय भरलं?.. बेपत्ता मुलाचा पोलिसांनी कसा घेतला शोध ?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मुंबई | 5 ऑक्टोबर 2023 : चांगल्या मार्कांचं, सतत अव्वल येण्याचं प्रेशर सध्या मुलांवर असतं. जे यात यशस्वी होतात, त्यांची वाहवा होते, पण ज्यांना अपेक्षित यश मिळत नाही, त्यांची काय अवस्था होत असेल. अपेक्षेच्या ओझ्याखाली दबलेली मुलं भावनेच्या भरात अशीच एखादी कृती करून बसतात, ज्यामुळे त्यांच्या आयुष्याचं नुकसान होऊ शकतं. पालकांचा जीव टांगणीला लागतो, ते वेगळचं अशीच एक घटना मुंबईत घडल्याचे समोर आले आहे. शाळेच्या परीक्षेमध्ये चांगले मार्क न मिळवू (scored poor marks) शकल्याने त्या मुलाला पालकांना सामोरं जायची इतकी भीती वाटली, की त्यापेक्षा घरातून निघून जाणंच त्याने सोयीस्कर समजलं. मात्र त्यानंतर पालकांची जी अवस्था झाली… अशी वेळ कोणावरही येऊ नये.

अवघ्या १५ वर्षांचा तो अल्पवयीन मुलगा ट्यूशनच्या नावे बाहेर पडला, आई हो म्हणाली. पण मुलाच्या बॅगेत पुस्तकांऐवजी दुसरंच काही सामान, कपडे असल्याचं तिच्या लक्षातच आलं. संध्याकाळी नेहमीची वेळ उलटून गेल्यावरही मुलगा घरी न आल्याचे पाहून पालकांना चिंता वाटू लागली आणि त्यांनी पोलिसांत धाव घेतली. ५ दिवस उलटूनही त्यांचा मुलगा घरी न आल्याने अवस्था अतिशय बिकट झाली होती. पण पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने त्या मुलाचा अखेर शोध लागला. पण ही परिस्थिती खरंच का उद्भवली, याचा विचार सर्वांनी करायची गरज असल्याचे या घटनेतून अधोरेखित झाले.

शाळेतील एक चूक त्याल नडली

परळमधील एका नामांकित शाळेत १० वीत शिकणाऱ्या या मुलाला 25 सप्टेंबर रोजी प्राथमिक परीक्षेचा रिझल्ट मिळाला. सगळ्यांनी आपल्या पालकांच्या सह्या त्यावर आणाव्यात अशी सूचना शिक्षकांनी दिली होती. मात्र सरासरीपेक्षा कमी गुण मिळाल्यामुळे, मुलाने रिपोर्ट कार्ड पालकांना दाखवण्यास टाळाटाळ केली, पण सही तर हवी होती. शेवटी टक्केवारीमध्ये थोडी खाडाखोड करून, त्याने आईकडून रिपोर्ट कार्डवर सही करू घेतली आणि दुसऱ्या दिवशी शाळेत सबमिट केले.. पण त्याचा हा खोडसाळपण वर्गशिक्षिकेच्या लक्षात आला आणि त्यांनी त्या मुलाच्या आई-वडिलांना बोलावून त्याची चूक दाखवली, तसेच त्या मूळ मार्कही सांगितले.

क्लासच्या नावाने बाहेर पडला पण….

शाळा सुटल्यावर तो मुलगा शांतपणे त्याच्या घरी गेला आणि आपण क्लासला निघालोय असे सांगून बाहेर पडला. पण त्याच्या बॅगेत पुस्तकांऐवजी काही कपडे आणि लॉकरमधून काढलेले 5 हजार रुपये होते, हे त्याच्या आईच्या लक्षातचं आलं नाही. त्या मुलाच्या वडिलांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे. संध्याकाळी सहाच्या सुमारास ते घरी आले, तोपर्यंत त्यांचा मुलगा घरी परत आला नव्हताच. एरवी रोज ५ वाजेपर्यंत क्लासवरून घरी येणार मुलगा, तासाभरानंतरही घरी न आल्याचे पाहून त्यांना चिंता वाटू लागली. त्यांनी सगळीकडे त्याचा शोध घेतला, मात्र तो काही सापडला नाहीच. अखेर त्याच्या वडिलांनी भोईवाडा पोलिस स्टेशनमध्ये धाव घेत (मुलगा अल्पवयीन असल्याने) अपहरणाची तक्रार नोंदवली.

अनेक दिवस पोलिस घेत होते शोध

या तक्रारीनंतर पोलिसांनी लगेच त्याचा शोध घेण्यास सुरूवात केली. मात्र गणपतीचे दिवस असल्याने रस्त्यांवर बरीच गर्दी होती. मुलगा बेपत्ता झाल्याची माहिती आम्ही आजूबाजूच्या सर्व पोलिस ठाण्यांना कळवली, त्याचे फोटोही पाठवले. त्याच चेहऱ्यामोहऱ्याचा एक मुलगा लालबाग आणि काळाचौकी परिसरात फिरत असल्याचे आम्हाला प्राथमिक तपासात समजले, परंतु या भागात गणपतीची गर्दी असल्याने आम्हाला त्याचा शोध लागला नाही, असे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर रेल्वे स्टेशनवर त्याचा शोध घेण्यास सुरूवात केली, त्यानुसार आम्ही जीआरपी रेल्वे पोलिसांना या घटनेची माहिती देत, असा मुलगा दिसल्यास आम्हाला कळवा, अशी सूचना दिल्याचेही पोलिसांनी नमूद केले. अनेक दिवस पोलिस त्याचा शोध घेत होते.

पीएसआय सचिन भोरसे यांच्या नेतृत्वाखाली शोध मोहिमेसाठी तैनात करण्यात आलेल्या पथकातील अधिकाऱ्यांना तो मुलगा दादर रेल्वे स्थानकावर दिसला. सुरुवातीला तो प्लॅटफॉर्मच्या बेंचवर बसलेला होता, नंतर तो चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढला. प्रभादेवी, मरीन लाइन्स, चर्चगेट या स्थानकांवर उतरायचा आणि नंतर तो परत दादर स्टेशनवर परत यायचा. एफसीटी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे प्लॅटफॉर्मच्या वेगवेगळ्या भागात किंवा विविध रेल्वे स्थानकांवरून त्याचे स्कॅनिंग करण्यात मदत झाली, असे पोलिसांनी सांगितले. परंतू त्याला लगेच पकडण्यात यश मिळत नव्हते, तो निसटत होता. अखेर बुधवारी सकाळी तो दादर रेल्वे स्थानकाच्या बाहेर पडल्याचे दिसल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. आणि सुखरूपरित्या त्याच्या आई-वडिलांकडे त्याला सोपवण्यात आले.

RELATED ARTICLES

प्रवासात गहाळ झालेली रोख रक्कम व सोन्याचे दागिने परत; पोलिसांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) नालासोपारा: मुंबईतून वसईत ओला कॅबने प्रवास करत असताना गहाळ झालेले ८० हजारांची रोख रक्कम व ५ लाख रुपये किंमतीचे...

देहू-आळंदी रस्त्यावर ट्रकच्या धडकेने महिलेचा जागीच मृत्यू, अपघातानंतर चालक पसार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) चिखली (पुणे) : देहू-आळंदी रस्त्यावरील मुख्य चौक म्हणून ओळख असलेल्या तळवडे चौकात दुपारी एका गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या ट्रकने...

ई-चालान भरा; नाहीतर लोकअदालतमध्ये हजर व्हा! १७ लाख वाहनचालकांना नोटीस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबईत दिवसेंदिवस वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या एकूण १७ लाख १०...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

प्रवासात गहाळ झालेली रोख रक्कम व सोन्याचे दागिने परत; पोलिसांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) नालासोपारा: मुंबईतून वसईत ओला कॅबने प्रवास करत असताना गहाळ झालेले ८० हजारांची रोख रक्कम व ५ लाख रुपये किंमतीचे...

देहू-आळंदी रस्त्यावर ट्रकच्या धडकेने महिलेचा जागीच मृत्यू, अपघातानंतर चालक पसार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) चिखली (पुणे) : देहू-आळंदी रस्त्यावरील मुख्य चौक म्हणून ओळख असलेल्या तळवडे चौकात दुपारी एका गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या ट्रकने...

ई-चालान भरा; नाहीतर लोकअदालतमध्ये हजर व्हा! १७ लाख वाहनचालकांना नोटीस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबईत दिवसेंदिवस वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या एकूण १७ लाख १०...

स्पार्कल कँडल’ कारखाना स्फोट प्रकरणी २ महिलांसह चौघांवर गुन्हा; एकाला अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : 'स्पार्कल कँडल' बनविणाऱ्या कारखान्यात स्फोट झाल्याप्रकरणी जागा मालक, कारखाना चालक तसेच दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला....

Recent Comments