Tuesday, April 29, 2025
Homeक्राईम न्यूजटी-ट्वेन्टीमध्ये निकोलस पूरनचे ६०० षटकार पूर्ण

टी-ट्वेन्टीमध्ये निकोलस पूरनचे ६०० षटकार पूर्ण

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

विशाखापट्टनम्ः आयपीएलच्या सोमवारी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सचा पराभव केला. या सामन्यात लखनौकडून खेळताना निकोलस पूरनने ३० चेंडूंत ६ चौकार व ७षटकारांसह ७५ धावांची खेळी केली. या दरम्यान त्याने टी-ट्वेन्टीमध्ये ६०० षटकार मारण्याचा विक्रम केला आहे.

या सामन्यापूर्वी पूरनने टी-ट्वेन्टी क्रिकेटमध्ये ५९९ षटकार मारले होते, पण या सामन्यात त्याने पहिला षटकार मारताच त्याच्या टी-ट्वेन्टी कारकिर्दीतील ६०० षटकार पूर्ण केले. ज्यामध्ये जगभरात खेळल्या जाणाऱ्या टी-ट्वेन्टी आंतरराष्ट्रीय आणि लीगचा देखील समावेश आहे. या फॉरमॅटमध्ये ६०० षटकार मारणारा पूरन हा जगातील फक्त चौथा फलंदाज बनला आहे.

टी-ट्वेन्टी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने ४६३ सामन्यांमध्ये १०५६ षटकार मारले आहेत. या फॉरमॅटमध्ये हजारांहून अधिक षटकार मारणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर कायरन पोलार्ड आहे, ज्याने आतापर्यंत ६९५ सामन्यांमध्ये ९०८ षटकार मारले आहेत. या यादीत आंद्रे रसेल तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ५३९ सामन्यांमध्ये ७३३ षटकार मारले आहेत. त्यानंतर येतो निकोलस पूरन. आतापर्यंत त्याने टी-ट्वेन्टी क्रिकेटमध्ये ३८५ सामने खेळले आहेत आणि ६०० हुन अधिक षटकार मारले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments