इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
डोक्यावरील केस हे आपल्याला चांगला लूक देतात. त्यामुळे महिलांसह पुरुषांमध्येही केसांचे विशेष आकर्षण असते. पण, काही पुरुषांमध्ये टक्कर पडण्याची समस्या असते. मात्र, ही समस्या दूर करण्यासाठी काही उपाययोजना केल्यास नक्कीच फायद्याचे ठरू शकते. त्यात मोहरीचे तेल गुणकारी ठरू शकते.
मोहरीचे तेल केसांना लावण्यासाठी वापरले जाते. जर तुमचे केस गळत असतील आणि तुमचे टक्कल पडत असेल तर हे तेल प्रभावी ठरू शकते. केसांसाठी मोहरीचे तेल प्रभावी ठरते. मोहरीच्या तेलामध्ये पोषक तत्वे, अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि फॅटी ऍसिड आढळतात, जे नैसर्गिकरित्या केसांच्या वाढीस आणि टक्कल कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत. केसांना मोहरीचे तेल लावल्याने अनेक फायदे होतात.
मोहरीच्या तेलात व्हिटॅमिन ए, ई के आणि ओमेगा-3 फॅटी अॅसिड आढळतात, ज्यामुळे केसांचे आरोग्य सुधारते. याशिवाय, ते रक्ताभिसरण वाढवण्याचे, केसांच्या कूपांना सक्रिय करण्यासाठी आणि मुळांपर्यंत ऑक्सिजन आणि पोषक तत्वे पोहोचवण्याचे काम करते.
केसांना मोहरीचे तेल कसे लावायचे?
तुम्ही मोहरीचे तेल थेट तुमच्या डोक्याच्या टक्कल पडलेल्या भागावरही लावू शकता. यासाठी 2-3 चमचे मोहरीचे तेल कोमट करा आणि नंतर बोटांच्या मदतीने टक्कल पडलेल्या ठिकाणावर मालिश सुरू करा. याने चांगला फरक दिसून येऊ शकतो.