Tuesday, April 29, 2025
Homeक्राईम न्यूजझोपेचा अभाव बनतीये एक सायलंट महामारी; 'अशी' मिळवता येईल त्यापासून सुटका

झोपेचा अभाव बनतीये एक सायलंट महामारी; ‘अशी’ मिळवता येईल त्यापासून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे: दिवसभर काम केल्यानंतर आपलं शरीर थकतं. त्यामुळे झोप ही आपोआपच येते. पण, काहींना लवकर झोप येत नाही किंवा अचानक झोप मोड होते. तेव्हा लक्ष देणे गरजेचे बनते. झोपेचा अभाव ही एक सायलंट महामारीच्या रूपात उदयास येत आहे, जी जगभरातील लाखो लोकांना प्रभावित करत आहे.

तुम्हीही झोपेच्या समस्येने त्रस्त आहात तर काही गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे ठरते. त्यात तुम्ही तुमचं शेड्युल तयार करा. झोपेचे आणि उठण्याचे निश्चित वेळापत्रक शरीराच्या अंतर्गत घड्याळाचे नियमन करण्यास मदत करते. उत्तम विश्रांती घेण्यासाठी प्रौढांनी रात्री 10-11 च्या दरम्यान झोपायला जाण्याचे निश्चित करावे. स्क्रीन टाईम मर्यादित करा. झोपेच्या किमान एक तास आधी स्क्रीनवर जाण्याचे प्रमाण कमी केल्याने तुमच्या मेंदूला आराम मिळतो. दुपारी दोननंतर कॅफिन टाळा आणि झोपेच्या तीन तास आधी अल्कोहोल यांसारख्या गोष्टी टाळा.

तसेच दररोज व्यायाम करा. ज्यांना सतत झोपेच्या समस्या येत आहेत, त्यांनी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. निद्रानाश किंवा श्वसनक्रिया बंद पडणे यांसारख्या विकारांवर उपचार केल्याने जीवनाची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात सुधारू शकते. याशिवाय, कामाचा ताण आणि रोजच्या चिंता यामुळे रात्रीची विश्रांती मिळण्यास अनेकदा अडथळा येतो. व्यावसायिकांसाठी हे एक मोठे मानसिक आव्हान बनत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments