Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज झोपमोड केल्याचा राग; पुण्यात भाडेकरूने घरमालकाला पाण्याच्या टाकीत बुडवून संपवले!

झोपमोड केल्याचा राग; पुण्यात भाडेकरूने घरमालकाला पाण्याच्या टाकीत बुडवून संपवले!

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुणे शहर आणि परिसरात मागील काही काळापासून गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. खून, जीवघेणे हल्ले, दुकानांची तोडफोड असे प्रकार सातत्याने घडत आहेत. अशातच शहरापासून जवळच असलेल्या लोणी काळभोर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. दुपारी झोपमोड केली, या क्षुल्लक कारणातून भाडेकरूने घरमालकाचा जीव घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. संतोष राजेंद्र धोत्रे (वय ३७, रा. खंडोबा माळ, ता. हवेली) असं आरोपीचं नाव असून दादा ज्ञानदेव घुले (वय ५०, रा. खंडोबा माळ, उरुळी देवाची, ता. हवेली) असं खून झालेल्या घरमालकाचं नाव आहे.

याप्रकरणी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संतोष धोत्रे हा दादा घुले यांचा भाडेकरू आहे. दोघेही बांधकामावर मिस्त्री म्हणून काम करतात. सोमवारी दुपारी ते दोघे दारु प्यायले होते. त्यानंतर संतोष धोत्रे हा झोपायला गेला. दादा घुले यांनी मोटारसायकल सुरू करुन तिचा एक्सिलेटर वाढवला. मोटारसायकल रेस करुन ठेवल्यामुळे धोत्रे याची झोपमोड झाल्याने त्यावरुन दोघांमध्ये वाद झाला.

बाचाबाचीचे रुपांतर नंतर हाणामारीत झाले आणि संतोष धोत्रे याने दादा घुले यांना मारहाण करुन पाण्याच्या टाकीत टाकले. त्यात घुले यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

दरम्यान, घुले हे दुपारी दीड वाजल्यापासून घरी आले नव्हते. त्यामुळे मृत दादा घुले यांचा पुतण्या प्रथमेश घुले हा आपल्या एका मित्राला घेऊन खंडोबाचा माळ देवाची उरुळी येथे गेला. घराची पाहणी केली तेव्हा दादा घुले यांची चप्पल आणि मोबाईल घरातील जमिनीखालील टाकीजवळ दिसून आला. टाकीत डोकावून पाहिले तेव्हा दादा घुले यांचा मृतदेह पाण्यावर तंगताना दिसून आला. प्रथमेश घुले यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन संतोष धोत्रे याला अटक केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र खैरनार हे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments