Thursday, November 30, 2023
Home क्राईम न्यूज झेंडूच्या फुलांनी आणले शेतकऱ्यांसमोर संकट....काय आहेत दर

झेंडूच्या फुलांनी आणले शेतकऱ्यांसमोर संकट….काय आहेत दर

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे, नाशिक | 23 ऑक्टोंबर 2023 : दसरा आणि दिवाळीसाठी झेंडूच्या फुलांना चांगली मागणी असते. या दोन्ही सणांना घराघरात झेंडूच्या फुलांची सजावट केली जाते. पुजेसाठी झेंडूची फुले वापरली जातात. यामुळे या सणाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी झेंडूची लागवड करतात. त्यामाध्यमातून सणासाठी शेतकऱ्यांच्या घरात चार पैसे येतात. परंतु यंदा दसऱ्याला झेंडूच्या फुलांनी नाराज केले आहे. झेंडूचे दर चांगलेच घसरले आहेत. पुणे, मुंबई, नाशिकच्या बाजारपेठेत झालेल्या घसरणीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. नाशिकमध्ये केवळ १० ते १५ रुपये असा भाव आहे.

पुण्यात मोठ्या प्रमाणावर आवक

पुणे शहरात दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी झेंडूची फुले विक्रीसाठी आली आहे. पुण्यातील मार्केटयार्ड फुल बाजारात झेंडूची फुले खरेदीसाठी मोठी गर्दी झाली आहे. मध्यरात्रीपासून या बाजारात झेंडू फुलांसोबत शेवंती, गुलाब ही फुले विक्रीसाठी आली आहे. पुणे जिल्ह्यातील जवळपास सर्व तालुक्यातून शेतकऱ्यांनी फुले विक्रीसाठी आणली आहे. बाजारात फुलांची आवक वाढली आहे. परंतु फुलांना चांगला दर मिळाला नाही. यामुळे शेतकरी वर्गासमोर सणाच्या पार्श्वभूमीवर संकट निर्माण झाले आहे.

नाशिकमध्ये १० ते १५ रुपये दर

दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या मनमाड बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आलेल्या झेंडूच्या फुलांना कमी दर मिळाला आहे. शेतकऱ्यांना १० ते १५ रुपये असा कवडीमोल भाव मिळाला आहे. झेंडुच्या फुलांमुळे दसरा दिवाळी गोड होईल, ही अपेक्षा शेतकऱ्यांना होती. त्यासाठी यंदा पाऊस नसताना डोक्यावर पाणी वाहून फुल शेती जगवली. मात्र फुलांना भाव मिळत नसल्याने उत्पादन खर्चही निघणे अवघड झाले आहे. फुल विक्रीतून दसरा-दिवाळी सण गोड होण्याचे बळीराजाचे स्वप्न भंगले आहे. मनमाड बाजार समितीमध्ये जवळपास दीडशे वाहनानांची आवक झाली होती…

मुंबईत कमी दर

दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर झेंडूच्या फुलांना चांगली मागणी असते. मुंबईतील दादर मार्केटमध्ये ग्राहकांनी फुले खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. परंतु बाजारात फुलांना मागणी जास्त आहे. त्यानंतरही फुलांना भाव कमी मिळत असल्याचे विक्रेत्यांनी म्हटले आहे. झेंडूची फुले रविवारी 50 ते 60 रुपये किलोने विकली गेली होती. परंतु सोमवारी त्यात घसरण झाली आहे. आता वीस ते तीस रुपयांपासून फुलांची विक्री होत आहे. यामुळे शेतकरी आणि विक्रेत्यांचे नुकसान होत आहे.

RELATED ARTICLES

शिरूर तालुक्यातील निर्वी येथे अपघातात साठ वर्षीय महिलेचा मृत्यू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) न्हावरे : निर्वी (ता. शिरूर) गावाच्या हद्दीत निर्वी - कोळगाव डोळस रस्त्यावर मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोने दुचाकीला धडक देऊन झालेल्या...

पुणे महापालिकेची कारवाई; रस्ते, पदपथ ठिकठिकाणी आढळणारी १३९ बेवारस वाहने जप्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : महापालिकेच्या हद्दीत रस्ते, पदपथावर ठिकठिकाणी आढळणाऱ्या बंद अथवा बेवारस अवस्थेतील वाहनांविरोधात महापालिका कारवाई करत आहेत. सुरुवातीला या...

सात वर्षाच्या मुलीवर आत्याचार करणाऱ्या नराधमास बारा वर्षाची सक्तमजुरी…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) राजगुरुनगरः चाकण येथे सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांनी १२...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

शिरूर तालुक्यातील निर्वी येथे अपघातात साठ वर्षीय महिलेचा मृत्यू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) न्हावरे : निर्वी (ता. शिरूर) गावाच्या हद्दीत निर्वी - कोळगाव डोळस रस्त्यावर मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोने दुचाकीला धडक देऊन झालेल्या...

पुणे महापालिकेची कारवाई; रस्ते, पदपथ ठिकठिकाणी आढळणारी १३९ बेवारस वाहने जप्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : महापालिकेच्या हद्दीत रस्ते, पदपथावर ठिकठिकाणी आढळणाऱ्या बंद अथवा बेवारस अवस्थेतील वाहनांविरोधात महापालिका कारवाई करत आहेत. सुरुवातीला या...

सात वर्षाच्या मुलीवर आत्याचार करणाऱ्या नराधमास बारा वर्षाची सक्तमजुरी…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) राजगुरुनगरः चाकण येथे सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांनी १२...

मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर कारवाई करा; पुणे महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालयांना आदेश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सर्वोच्च न्यायालयाने दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणे शहरातील सर्व आस्थापनांच्या पाट्या देवनागरी लिपीत...

Recent Comments