Wednesday, November 29, 2023
Home क्राईम न्यूज झटपट उरकून घ्या ही कामे, नाहीतर होईल नुकसान

झटपट उरकून घ्या ही कामे, नाहीतर होईल नुकसान

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

नवी दिल्ली | 27 सप्टेंबर 2023 सप्टेंबर महिना लवकरच संपणार आहे. त्यासाठी आता केवळ तीन दिवस (Financial Work Deadline) उरले आहेत. त्यामुळे काही आर्थिक कामे झटपट उरकून घ्या. त्यासाठी 30 सप्टेंबर 2023 ही डेडलाईन आहे. या निश्चित कालावधीत तुम्ही ही कामे पूर्ण केली नाही तर तुम्हाला नाहक फटका बसेल. 2000 रुपयांच्या गुलाबी नोटा बदलवून घेण्यासाठी आता केवळ तीनच दिवस उरले आहेत. ग्राहकांसाठी एसबीआयने एक योजना पण आणली आहे. या गुलाबी नोटा (2000 Rupees Note ) तुम्ही एसबीआयच्या मुदत ठेव योजनेत गुंतवणूकीसाठी वापरु शकता. तर इतर काही अल्पबचत योजनांमध्ये काही अपडेट करण्यासाठी कमी कालावधी उरला आहे. ही कामे या तीन दिवसात पटकन उरकून घ्या.

2000 रुपयांच्या नोटा

2000 रुपयांच्या नोटा बदलण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. अजूनही काही लपविलेल्या गुलाबी नोटा सापडल्या असतील अथवा आठवल्या असतील तर त्या झटपट बदलून घ्या. त्यानंतर या नोटा चलनात नसतील. त्यासाठी 30 सप्टेंबर 2023 ही डेडलाईन आहे. म्हणजे अवघे तीन दिवस उरले आहेत. नाहीतर त्यांचा वापर करता येणार नाही. 19 मे 2023 रोजी या गुलाबी नोटा वितरणातून बाहेर करण्याचा निर्णय झाला. या नोटा बदलण्याची प्रक्रिया लागलीच सुरु करण्यात आली. आता ही अंतिम मुदत अगदी तोंडाशी आली आहे. बाजारातील सध्याच्या 93 टक्के नोटा या 31 ऑगस्ट 2023 रोजीपर्यंत परत आल्या आहेत.

अल्पबचत योजना

सप्टेंबर महिन्यात पोस्ट ऑफिसच्या अल्पबचत योजनांमध्ये (Post Office Small Saving Schemes) गुंतवणुकीसाठी खास आहेत. यामध्ये पब्लिक प्रोव्हिडंट फंड आणि सुकन्या समृद्धी योजनांसह इतर योजनांमध्ये गुंतवणूक करता येते. या योजनांमध्ये या तीन दिवसांमध्ये • आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक आहे. असे न केल्यास तुमचे खाते काही काळासाठी गोठविण्यात येईल. केंद्रीय अर्थमंत्रालयाने याविषयीची अधिसूचना काढली आहे.

बँक लॉकर

एसबीआय, बँक ऑफ बडोदासह अन्य बँकांमध्ये लॉकर असलेल्या ग्राहकांना अलर्ट येत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने बँक लॉकर ग्राहकांना नवीन करार करणे आवश्यक आहे. जर तुमचे पण बँकेत लॉकर असेल तर 30 सप्टेंबर 2023 पर्यंत हा करार करुन घ्या. तुम्ही नियमांचे पालन केले नाही तर तुम्हाला बँकेचे लॉकर हाताळता येणार नाही. बँकांनी अशा ग्राहकांना एसएमएस पाठवला आहे. अंतर्गत 30 जून पर्यंत 50 टक्के, 30 सप्टेंबरपर्यंत 75 टक्के तर 31 डिसेंबरपर्यंत 100 टक्के ग्राहकांना हे काम पूर्ण करायचे आहे. तर डीमॅट खाते आणि इतर योजनांमध्ये केवायसीची पूर्तता करणे आवश्यक आहे.

RELATED ARTICLES

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

आंबेगाव तालुक्यातील अवसरी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) अवसरी आयेगाव तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या जवसरी खुर्द, अवसरी बुद्दक, गावडेवाडी या परिसरात पाऊस झाला. अवसरी खुर्द येथे साडेतीन...

Recent Comments