Friday, June 14, 2024
Homeक्राईम न्यूजज्वेलर्सवर भरदिवसा दरोडा ! ५० लाखांच्या मुद्देमालासह दरोडेखोरांना अटक; गुन्हे शाखेची कामगिरी

ज्वेलर्सवर भरदिवसा दरोडा ! ५० लाखांच्या मुद्देमालासह दरोडेखोरांना अटक; गुन्हे शाखेची कामगिरी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुण्यातील वानवडी परिसरात वाडकर मळा येथील वर्दळीच्या ठिकाणी दिवसाढवळ्या शफीउद्दीन शेख यांच्या बीजेएस यांच्या सोन्याच्या दुकानावर ७ ते ८ जणांनी दरोडा टाकला होता. या दरोड्यात ५०० ग्राम सोने चोरून नेले होते. ही घटना १८ मे रोजी सकाळी १२ वाजण्याच्या सुमारास वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बी.जी.एस. ज्वेलर्स येथे घडली. या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावरून पुणे गुन्हे शाखेच्या पथकाने काही तासातच दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

सनी ऊर्फ योगेश हिरामण पवळे (वय-२०), सनी ऊर्फ आदित्य राजु गाडे (वय-१९) दोघेही रा. वसंतनगर, केळेवाडी, कोथरुड, पियुष कल्पेश केदारी (वय-१८, रा. जयप्रकाश नगर, माऊली चौक, येरवडा) ओमकार ऊर्फ ओम्या जगन वाल्हेकर (वय-१९, रा. जयभवानीनगर, कोथरुड) नारायण ऊर्फ नारु बाळु गवळी (वय-२०, रा. टिळेकर नगर, इस्कॉन मंदिराजवळ, कोंढवा रोड, कात्रज), मयुर चुन्नीलाल पटेल (वय-५३ वर्षे, लोकरे बिल्डींग, कामधेनु पार्क शेजारी, वानवडी) नासिर मेहमुद शेख (वय-३२, रा. चांभारवाडूर वानवडी) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नवे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरात दिवसाढवळ्या दरोडा पडल्याने पुणे पोलिसांमोर मोठ आव्हान निर्माण झालं होतं. मात्र, गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे यांनी कारवाईचे सूत्र हातात घेत आरोपींचा शोध घेण्यासाठी पाच पथके तयार केली. दरम्यान, आरोपींनी पोलिसांना गुंगारा देत दरोडा टाकून अहमदनगरच्या दिशेने पळ काढला. त्यानंतर काही वेळातच चाकण, मुळशी, कोथरूड परिसरात परत आले. यावेळी सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषणाद्वारे पोलिसांनी दुचाकीचा शोध घेत आरोपींना ताब्यात घेतलं. तसेच त्यांच्याकडून सुमारे 50 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments