Saturday, March 15, 2025
Homeक्राईम न्यूजज्येष्ठ साहित्यिक, प्रसिद्ध वृत्तनिवेदक अनंत भावे यांचे निधन; ८८ व्या वर्षी घेतला...

ज्येष्ठ साहित्यिक, प्रसिद्ध वृत्तनिवेदक अनंत भावे यांचे निधन; ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : आपल्या भाषा शैलीने ‘दूरदर्शन’वर वृत्तनिवेदक म्हणून स्वतःचा वेगळा ठसा उमटविणारे ज्येष्ठ मराठी साहित्यिक प्रा. अनंत भावे यांचे काल (रविवारी) पुण्यात अल्पशा आजाराने निधन झाले. ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे मराठी भाषेवर चांगले प्रभुत्व होते. बालसाहित्यामधील योगदानाबद्दल प्रा. भावे यांना २०१३ मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता.

प्रा. अनंत भावे यांच्या पत्नी मराठी समीक्षक, सामाजिक कार्यकर्त्या प्रा. पुष्पा भावे यांचे २०२० मध्ये मुंबईत निधन झाले होते. त्यानंतर ते पुण्यातील बाणेरमधील ‘अथश्री’ अपार्टमेंट्समध्ये राहण्यास होते. मुंबईतील सोमय्या महाविद्यालयात मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून प्रा. भावे यांनी काम पाहिले.

‘अज्जब गोष्टी गज्जब गोष्टी’, ‘अशी सुट्टी सुरेख बाई’, ‘कासव चाले हळूहळू’, ‘चल रे भोपळ्या टुणूक टुणूक’, ‘चिमणे चिमणे’ अशी त्यांची ५० हून अधिक बालवाङ्मय आणि कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांनी साप्ताहिक ‘माणूस’ मध्ये स्तंभलेखन केले. दै. ‘महानगर’मध्ये त्यांचे ‘वडापाव’ हे खुसखुशीत लोकप्रिय सदर होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments