Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजज्येष्ठ नागरिक मैत्रीणीने मैत्रिणीचे चोरले 8 लाखांचे दागिनेः कोथरुड पोलिस ठाण्यात गुन्हा...

ज्येष्ठ नागरिक मैत्रीणीने मैत्रिणीचे चोरले 8 लाखांचे दागिनेः कोथरुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

एकत्र राहत असताना मैत्रिणीच्या घरातील तब्बल 8 लाख 81 हजारांचे दागिने चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दागिने मैत्रीणीनेच चोरले असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

अमरजा कुलकर्णी नावाच्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत स्वाती मुकुंद जोशी (68, रा. वारजे, पुणे) यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार एप्रिल 2023 ते ऑगस्ट 2023 दरम्यान घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्वाती आणि अमरजा कुलकर्णी या मैत्रिणी आहेत. अमरजा कुलकर्णी ही स्वाती जोशी यांच्या घरी 2021 ते 2023 दरम्यान राहण्यास आल्या होत्या. या सदनिकेची चावी शेजारी राहणाऱ्या कुटुंबियांकडे ठेवली जात होती. जुलै 2023 ते ऑगस्ट 2023 दरम्यान जोशी यांच्या घरातील 8 लाख 81 हजारांचे दागिने चोरीला गेले.

दरम्यान याबाबत जोशी यांना समजल्यानंतर त्यांनी अमरजा कुलकर्णी हिला संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु तिचा कोणताही संपर्क झाला नाही. त्यामुळे तिनेच दागिने चोरल्याची खात्री झाल्यानंतर याबाबत फिर्याद देण्यात आली आहे.

चोऱ्याचे कारण सांगून महिलेचे दागिने लंपास

मुलीची आणि नंदावे यांची ओळख सांगून पायी जाणाऱ्या ज्येष्ठ महिलेला रस पिण्यासाठी नेले. तसेच तिला चोऱ्या होत असल्याचे कारण सांगून दागिने पिशवीत ठेवण्यास सांगून तब्बल 75 हजारांचे दागिने हातचलाखी करून चोरून नेले. याप्रकरणी अज्ञात महिलेवर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मालन बबन राजगे (65, रा. काटे वस्ती, कुंजीर कॉलनी, पिंपळे सौदागर) यांनी याबाबत हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments