इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुणे शहरात घरफोडी करणाऱ्या एका अट्टलचोराला शिवाजीनगर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. या चोरट्याने पुण्यातील विविध भागात 50 ठिकाणी घरफोड्या केल्या आहेत. हा तरुण ज्या ठिकाणी राहायचा, त्या ठिकाणी तो रेकी करायचा आणि त्यानंतर त्याच भागात वेशभूषा करुन चोरी करायचा अशी माहिती उघडकीस आली आहे. हर्षद पवार असे या चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून 236 ग्रॅम सोन्याचे दागिने, 212 ग्राम चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहे.
नेमकं प्रकरण काय?
काल (दि. 13) पुण्यातील शिवाजीनगर पोलिसांनी एका अट्टल चोरट्याला अटक केली आहे. या चोरट्याने पुणे शहरातील विविध भागात तब्बल 50 ठिकाणी घरफोड्या केल्या असल्याची माहीती समोर आली आहे. या चोरट्याकडे 49 बनावट चाव्याही आढळल्या आहेत. हर्षद गुलाब पवार अस या चोरट्याचं नाव आहे.
जिथे राहायचा, तिथेच करायचा चोरी..
पुण्यातील शिवाजीनगर पोलिसांनी त्याचे अलीकडच्या काळात केलेले 13 गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्याच्यावर त्याआधीचे 51 गुन्हे दाखल असून तो ज्या ठिकाणी राहायचा, त्याच ठिकाणी तो रेकी करायचा आणि नंतर त्याच भागात चोरी करायचा. विशेष म्हणजे चोरी करताना तो वेशभूषा करुन चोरी करायचा. एक विशेष म्हणजे ज्या ठिकाणी सीसीटीव्ही आहे त्या ठिकाणी तो चोरी करत नसे. मात्र ज्या ठिकाणी सीसीटीव्ही नाही, त्या ठिकाणी तो जाऊन चोरी करत असे. त्याच्याकडून चोरी करण्यात आलेला 236 ग्रॅम सोन्याचे दागिने, 212 ग्रॅम चांदीचे दागिने असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
त्यासोबतच घरफोडी करण्यासाठी वापरलेलं साहित्य जप्त करण्यात आलं आहे. त्यामध्ये 49 बनावट चाव्यांचा समावेश आहे. त्याला याआधी देखील तीन ते चार वेळा अटक करण्यात आली आहे. मात्र जामिनावर सुटल्यानंतर तो पुन्हा घरफोड्या करायचा. पुढील तपास पोलीस करत आहेत.