Monday, December 11, 2023
Home क्राईम न्यूज ज्या घरचं मीठ खाल्लं त्यांनाच लुबाडलं, व्यावसायिकाच्या घरातून 90 लाख लांबवणाऱ्याला अटक

ज्या घरचं मीठ खाल्लं त्यांनाच लुबाडलं, व्यावसायिकाच्या घरातून 90 लाख लांबवणाऱ्याला अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मुंबई | 17 ऑक्टोबर 2023 : शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या (crime in city) घटनांमुळे नागरिक धास्तावले आहेत. पोलिसांनी कठोर बंदोबस्त ठेवूनही अनेक गुन्हे दररोज घडत असून त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र गुन्हे हे। नेहमीच बाहेरचे लोक करतात असं नाही काहीवेळ घरातील, विश्वासू व्यक्तीही एखाद्या लोभाने असं कृत्य करते ज्यामुळे मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं.

ज्या घराने आसरा दिला, हाताला काम आणि उदरनिर्वाहासाठी पैसा दिला, ज्यांच्या घरचं मीठ खाल्लं त्यांच्याच घरात त्यांना फसवून लाखो रुपये लुबाडल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक (man arrested) करण्यात आली आहे. बिझनेसमनच्या घरातून 90 लाखांचा माल चोरल्याप्रकरणी दादर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. विद्यानंद उपेंद्र पासवान उर्फ वीरेंद्र असे त्याचे नाव असून तो त्यांच्याकडे मदतनीस म्हणून काम करत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, जितेन मिस्त्री हे व्यावसायिक दादर येथे राहतात. 12 ऑक्टोबर रोजी त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत घरातील नोकराने पैसे चोरल्याची फिर्याद दिली. दुसऱ्या दिवशी पहाटे एकच्या सुमारास आरोपी वीरेंद्र याला अटक करण्यात आली.

दोन वर्षांपासून करायचा काम

फिर्यादी मिस्त्री यांचा दादरमधील एका इमारतीमध्ये 5 BHK फ्लॅट असून तेथे ते त्यांच्या आई-वडिलांसोबत रहायचे. त्यांचे पालक पैसे आणि दागिने हे त्यांच्या खोलीतील एका कपाटातच ठेवायचे. मिस्त्री हे कामानिमित्त वरचेवर बाहेर जायचे त्यामुळे आई-वडील आणि मुलांची काळजी घेण्यासाठी त्यांना एका मदतनीसाची गरज होती. अखेर जानेवारी 2021 मध्ये त्यांनी वीरेंद्र याची कामावर नियुक्ती केली. तो मूळचा बिहारमधील दरभंगा येथील रहिवासी आहे. एप्रिल महिन्यात मिस्त्री यांच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर मात्र वीरेंद्र याने त्यांच्या घरात चोरी करण्यास सुरूवात केली. मिस्त्रींच्या आईच्या खोलीतील कपाटामध्ये ठेवलेले पैसे आणि दागिने तो लंपास करू लागला.

12 ऑक्टोबर रोजी मिस्त्री यांनी वीरेंद्रला चोरी करतना रंगेहात पकडले. त्यांनी त्याला जाब विचारला असता वीरेंद्र यानेच मोठ्या आवाजात आरडाओरडा करायला सुरूवात केली आणि तो गडबडीने घरातून पळून गेला. त्यानंतर मिस्त्री यांनी त्यांच्या आईचे कपाट तपासले असता, सुमारे 50 लाख रुपयांची रोख रक्कम आणि 40 लाखांची सोन्याची बिस्कीटे असा एकूण 90 लाखांचा माल घेऊन (नोकर) वीरेंद्र पळून गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. हे समजल्यावर ते हादरलेच. त्यांनी दादर पोलिस स्टेशनमध्ये धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत आरोपी वीरेंद्र याला अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे. चोरीचा माल कुठे लपवला, याचीही पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

‘या’ बँकेत भरती प्रक्रिया सुरू, ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख, लगेचच करा अर्ज

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई : पदवीधरांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे तुम्ही कोणत्याही विषयात पदवी घेतली असेल तरीही तुम्हाला थेट बँकेत नोकरी...

पिंपरी चिंचवड महापालिकेतील अधिकाऱ्यांवर आयुक्तांचा नाही अंकुश, प्रशासनाबाबत तक्रारी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : महापालिकेच्या कारभारावर आयुक्तांचा अंकुश नसल्याचा आरोप होत आहे. विविध विभागांचे प्रमुख तसेच अधिकारी काम करत नसल्याच्या तक्रारी...

एक दिवसासाठी काम बदलले अन् जीव वाचला! आगीतून वाचलेल्या रेणुका ताथोड यांची ‘आपबीती’

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : "दररोज स्पार्कल कँडलला स्टिकर लावण्याचे काम करायचे. पण, शुक्रवारी स्पार्कल कँडलला टोपण लावायचे काम दिले. त्यामुळे आग...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘या’ बँकेत भरती प्रक्रिया सुरू, ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख, लगेचच करा अर्ज

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई : पदवीधरांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे तुम्ही कोणत्याही विषयात पदवी घेतली असेल तरीही तुम्हाला थेट बँकेत नोकरी...

पिंपरी चिंचवड महापालिकेतील अधिकाऱ्यांवर आयुक्तांचा नाही अंकुश, प्रशासनाबाबत तक्रारी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : महापालिकेच्या कारभारावर आयुक्तांचा अंकुश नसल्याचा आरोप होत आहे. विविध विभागांचे प्रमुख तसेच अधिकारी काम करत नसल्याच्या तक्रारी...

एक दिवसासाठी काम बदलले अन् जीव वाचला! आगीतून वाचलेल्या रेणुका ताथोड यांची ‘आपबीती’

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : "दररोज स्पार्कल कँडलला स्टिकर लावण्याचे काम करायचे. पण, शुक्रवारी स्पार्कल कँडलला टोपण लावायचे काम दिले. त्यामुळे आग...

कसबा पेठेतील तीन मजली जुन्या महाजन वाड्याला भीषण आग लागली.

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : कसबा पेठेतील मोटे मंगल कार्यालयाजवळील तीन मजली जुन्या महाजन वाड्याला सोमवारी पहाटे ४ वाजता भीषण आग लागली....

Recent Comments