Thursday, June 13, 2024
Homeक्राईम न्यूजजेष्ठ नागरिकाचा गळा आवळून केला निर्घण खून; ओतूर येथील घटना

जेष्ठ नागरिकाचा गळा आवळून केला निर्घण खून; ओतूर येथील घटना

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

जुन्नर, (पुणे) : एका ज्येष्ठ नागरिकाचा अज्ञात व्यक्तीने मारहाण करत गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी ७ जून रोजी रात्री साडेनऊ ते शनिवारी ८ जून रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेत नबाब अहमद शेख (वय-७२, रा. ओतूर, ता. जुन्नर, जि. पुणे) असे खून झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे.

याबाबत नबाब यांचा मुलगा शादाब नबाब शेख (वय-४२, मुळ रा. निमोन तास, ता. संगमनेर जि. अहमदनगर, सध्या. रा. वडगाव पान, ता. संगमनेर जि. अहमदनगर यांनी रात्री उशीरा ओतूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ओतूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नबाब अहमद शेख हे ओतूर गावचे हद्दीत वडारवस्ती जवळ पानसरे यांच्या जुन्या इमारतीमध्ये त्यांच्या भावासोबत राहत होते. शुक्रवारी ७ जून रोजी त्यांचा भाऊ कामानिमीत्त बाहेर गावी गेला होता. दरम्यान, शुक्रवारी रात्री साडेनऊ ते शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने नबाब शेख यांच्या हनुवटीवर मारून त्यांना जखमी करून गळा आवळून निर्घण खून केला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे आणि जुन्नर उपविभागीय अधिकारी रविंद्र चौधर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत ओतूर पोलीसांना सुचना दिल्या. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एल.जी. थाटे करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments