Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजजेवण वाढताना वाद; महिलेकडून पतीवर चाकूने वार, भवानी पेठेतील घटना

जेवण वाढताना वाद; महिलेकडून पतीवर चाकूने वार, भवानी पेठेतील घटना

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : जेवण वाढताना वाद झाल्याने महिलेने पतीवर चाकूने वार केल्याची घटना भवानी पेठ परिसरात घडली. याप्रकरणी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जया रमेश ससाणे (३४, रा. पत्र्याची चाळ, जयभीम मित्र मंडळाजवळ, भवानी पेठ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत रमेश बबन ससाणे (४३) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रविवारी रमेश ससाणे कामावरून घरी जेवण करण्यासाठी आले. त्यावेळी पत्नी जयाने त्यांच्याकडे ५०० रुपये मागितले. पैसे न दिल्याने त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर तिने जेवण वाढताना ताट आणि तांब्या आपटला. त्यामुळे रमेश यांनी पत्नीला चापट मारली. या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यातून जयाने पती रमेश यांचा दंड आणि पाठीवर चाकूने वार केले. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक फौजदार भोसले करत आहेत.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments