Tuesday, December 3, 2024
Homeक्राईम न्यूजजेवण बनवण्याच्या वादातून तरुणाची लोखंडी रॉडनी ११ घाव घालून हत्या; पिंपरीतील घटनेने...

जेवण बनवण्याच्या वादातून तरुणाची लोखंडी रॉडनी ११ घाव घालून हत्या; पिंपरीतील घटनेने खळबळ

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पिंपरी : पिंपरी- चिंचवड परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जेवण बनवण्याच्या वादावरून तरुणाची लोखंडी रॉडनी ११ घाव घालून हत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना शनिवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास चिंचवड मधील व्ही. के. व्ही कंपनीत घडली आहे. दिपू कुमार असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मुकेश हिरा कुसवाह असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुकेश हिरा कुसवाह आणि हत्या झालेला दिपू कुमार यांच्यासोबत इतर तीन तरुण चिंचवड मधील व्ही. के. व्ही कंपनीत काम करत होते. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने दोन महिन्यापूर्वीच दिपू कुमार हा चिंचवडमधील कंपनीत काम करण्यासाठी आला होता. कंपनीत एकूण पाच जण काम करायचे आणि तिथेच राहून जेवण बनवून खात असायचे.

मात्र, शुक्रवारी जेवण बनवण्यावरून मुकेश आणि दिपू यांच्यात वाद झाले. काही वेळानंतर सर्वजण जेवण करून झोपले. दिपू इतर दोन तरुणांसह झोपला. शनिवारी रात्री एकच्या सुमारास मुकेश कुसवाह झोपत नव्हता. तो सतत विचारात होता. त्याला दिपू कुमारचा राग आला होता. याच रागातून झोपेत असलेल्या दिपू कुमारच्या डोक्यात अवघ्या वीस सेकंदात 11 लोखंडी रॉडने वार करून निघृण हत्या केली. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी मुकेश हिरा कुसवाहला अटक केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments