इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
सासवड : येथील जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील गोरगरिबाना लोन करुन देतो, असे म्हणून फसविणा-या टोळीतील भावास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. तर या टोळीतील बहीण अद्यापही फरार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
इसम अस्लम गोडया सयद मुलानी (भाऊ) आणि यास्मीन भालदार (बहीण) अशी त्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार रामचंद्र मारूती गायकवाड (वय 42, व्यवसाय प्रिटींग प्रेस रा. सोमेश्वरनगर ता. बारामती जि. पुणे) यांना मोबाईलवरून लोन अॅप डाउनलोड करून, त्यावरून लोन करून लोनची वरील रक्कम स्वतःच्या खात्यावर घेवुन आमची फसवणुक केली असल्याचे त्यांनी तक्रारात सांगितले आहे. यामध्ये निरा गावातील 1) गणेश पडघमकर रा. निरा यास 1,00,000-80 रु. 2) नितीन निगडे (रा. गुळुंगे ता. पुरंदर यास 65000-00 रु. 3) युवराज रामा चव्हाण रा. जेठर यास 62400-00 रुपयास, 4) दत्तात्रय काशीनाथ माने रा. वाणेवाडी ता. बारामती जि. पुणे यास 35000-00 रु., 5) अविनाश बाबासो गायकवाड रा. करंजे ता. बारामती जि. पुणे यास 16500-00 रुपयास असे यांना वेळावेळी एकुण 4,81,400-00 रुपयाची फसवणुक केली असल्याचे त्यांनी तक्रारात सांगितले आहे.
त्यावरुन 1) अस्लम गोंडया सयद मुलाणी (रा. शिवतकारवाडी निरा, ता पुरंदर जि. पुणे, 2) यास्मीन भालदार (रा. शिवतकार वाडी निरा ता. पुरंदर जि. पुणे) व त्याचे इतर साथीदाराविरूध्द तकार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीवरून जेजुरी पोलीस स्टेशन गु.र.न 367/2024 बीएन.एस 318 (4), 3 (5) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दाखल गुन्ह्याच्या तपासात आरोपी अस्लम गोडया समद मुलाणी यास ताब्यात घेवुन त्याच्याकडे चौकशी करता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची 4 दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजुर केली आहे. आरोपी अस्लम गोंडया सयद मुलाणी याची बहीण यास्मीन भालदार ही अदयाप फरार आहे. तिच्या शोधकामी एक टीम रवाना करण्यात आली आहे.
सदरची कारवाई पंकज देशमुख, पोलीस अधिक्षक सत्रो, पुणे ग्रामीण, गणेश बिराजदार, अपर पोलीस अधिक्षक, बारामती विभाग बारामती, यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी, भोर विभाग सासवड, तानाजी बरडे उपविभागीय पोलीस अधिकारी, यांच्या सुचनाप्रमाणे दिपक वाकचौरे, सहायक पोलीस निरीक्षक, जेजुरी पोलीस स्टेशन, सर्जेराव पुजारी पोलीस उपनिरीक्षक, जेजुरी पोलीस स्टेशन यांनी केली आहे.
या प्रकरणातील गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी हे करीत आहे.