Tuesday, December 3, 2024
Homeक्राईम न्यूजजेजुरी देवसंस्थानच्या प्रमुख विश्वस्तपदी अभिजित देवकाते

जेजुरी देवसंस्थानच्या प्रमुख विश्वस्तपदी अभिजित देवकाते

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा मंदिराचे व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री मार्तंड देवसंस्थानच्या प्रमुख विश्वस्तपदी अभिजित अरविंद देवकाते यांची निवड करण्यात आली आहे. याआधीचे प्रमुख विश्वस्त अनिल सौंदडे यांचा कार्यकाल संपल्याने नुकतीच प्रमुख विश्वस्तपदाची निवडणूक घेण्यात आली. या वेळी सर्वानुमते देवकाते यांची प्रमुख विश्वस्तपदी निवड करण्यात आली.

प्रमुख विश्वस्त अभिजित देवकाते यांनी भाजपाच्या युवा मोर्चाचे प्रदेश सचिव, राज्याच्या भाजपा भटके विमुक्त आघाडीचे सरचिटणीसपदी काम केले असून सध्या ते भाजपा पुणे जिल्हा सरचिटणीस म्हणून काम पाहात आहेत. त्यांच्या माध्यमातून सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात सतत वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत.

जेजुरी देवसंस्थानचा प्रमुख विश्वस्त म्हणून श्री खंडोबा देवाचे खांदेकरी, मानकरी, पुजारी, सेवेकरी वर्ग, सर्व ग्रामस्थ व देवसंस्थान यांच्यामध्ये योग्य समन्वय राखून सर्वांचे विचार व सर्वांना सोबत घेऊन यात्रा उत्सव पार पाडणार आहे. भाविक भक्तांच्या सोयी-सुविधांकडे विशेष लक्ष देत विशेष योजना राबविण्यासाठी कटिबध्द राहू, अशी ग्वाही अभिजित देवकाते यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments