Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजजेएसपीएम संस्थेच्या शाळेत तोडफोड प्रकरण: 5 जणांविरुद्ध लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा...

जेएसपीएम संस्थेच्या शाळेत तोडफोड प्रकरण: 5 जणांविरुद्ध लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे शहरातील वाघोली परिसरातील जेएसपीएम संस्थेच्या शाळेत बळजबरीने शिरुन एका मुलीचे हॉल तिकिट मिळवण्यासाठी तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी प्रकाश जमदाडे (रा. ड्रीम संकल्प सोसायटी, बकोरी रस्ता, वाघोली), अक्षय सुर्यवंशी, तुषार बबन तांबे (रा. संघर्ष चौक, चंदननगर), यांच्यासह पाच आरोपी विरुद्ध लोणीकंद पोलिस ठाण्यात भादवि कलम ४५२,४२७,५०४, ५०६,१४३,१४७,१४९, क्रिमीनल लॉ अमेंडमेटअक्ट ३, ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी जेसपीएम संस्थेच्या वाघोलीतील प्रोडीजी पब्लिक स्कुलमधील कर्मचारी युवराज हरिदास कांबळे (वय ४०, रा. ढगे वस्ती, लोणीकंद, नगर रस्ता, पुणे) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात अारोपी विरोधात तक्रार दिली आहे. ज्ञानेश्वर गायकवाड यांची मुलगी प्रोडीजी पब्लिक स्कुलमध्ये दहावीत आहे. दहावीच्या मराठी विषयाचे परीक्षेचे प्रवेश पत्र (हॉल तिकिट) घेण्यासाठी गायकवाड १९ फेब्रुवारी रोजी दुपारी आले होते. त्यावेळी शाळेतील कर्मचारी कांबळे यांनी त्यांना प्रवेश पत्र घेण्यासाठी काही वेळानंतर येण्यास सांगितले.

शाळेतील प्राचार्य शिल्पा परीक्षा केंद्रात गेल्या आहेत, असे त्यांना सांगितले. या कारणावरून पालकांनी शाळेत कार्यालयात येऊन अरेरावीची भाषा सुरु करत गोंधळ घातला. जमदाडे, तांबे, सूर्यवंशी यांच्यासह चार ते पाच जण शाळेच्या कार्यालयात प्राचार्य केबीन मध्ये शिरले. त्यांनी विद्यार्थिनीचे प्रवेश पत्र देण्याची मागणी करून अाम्हाला थांबण्यास वेळ नाही म्हणत, शाळेत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. शाळेच्या आवारात ठेवण्यात आलेल्या फावड्याने काचा फोडल्या. हातातील फावडे हवेत फिरवून मोठमोठ्याने अरडाअ ओरड करुन, कोणी पुढे अाले तर एकेकाला जिवंत सोडणार नाही असे धमकावले. तसेच कार्यालयातील संगणक, प्रिंटर, खुर्चाची तोडफोड केली. तोडफोडीत अडीच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे कांबळे यांनी तक्रारीत सांगितले आहे. याप्रकारामुळे घाबरुन ते दुखापत होऊ नये म्हणून त्याठिकाणावरुन जीव वाचवून अॉफीसचे बाहेर पळून गेले. तसेच अारोपींनी अाता एक एकाला पाहून घेतो अशी धमकी देखील देत शिवीगाळ केली. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments