इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : शहरातील हडपसर परिसरातील जेएसपीएम कॉलेज जवळ रात्री 12 वाजता अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात एक तरुण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमी तरुण मद्यपान करून गाडी चालवत असल्याचं प्रत्यक्षदर्शीनी म्हटलं आहे. या आपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यात गाडीचे मोठे नुकसान झालेले दिसत आहे.
अधिक माहिती अशी की, पुण्यातील हडपसर परिसरात जेएसपीएम कॉलेज जवळ रात्री 12 च्या सुमारास एका चालकाचं वेगावरचं नियंत्रण सुटलेली कार जोरदार येऊन धडकली. या गाडीने धडक दिल्याने इतरही गाड्यांचं नुकसान झालं आहे. अपघात झाल्यानंतर घटणास्थळावारील नागरिकांनी चालकाला कार बाहेर काढत पोलिसांच्या हवाली केलं. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे.