Thursday, November 30, 2023
Home क्राईम न्यूज जुन्या 44 टोलनाक्यांचं काय होणार?; राज ठाकरे यांच्यासोबतच्या बैठकीतील मोठा निर्णय काय?

जुन्या 44 टोलनाक्यांचं काय होणार?; राज ठाकरे यांच्यासोबतच्या बैठकीतील मोठा निर्णय काय?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मुंबई | 13 ऑक्टोबर 2023 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्यातील टोलनाक्याबाबतची चर्चा यशस्वी झाली आहे. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय झाले आहेत. या बैठकीनुसार राज्यातील जुने 44 टोलनाके बंद करण्यात येणार आहेत. त्यावर निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक महिन्याचा अवधी मागून घेतला आहे, अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी टोलच्या मुद्दयावर चर्चा झाली. त्यानंतर आज पुन्हा राज ठाकरे आणि राज्याचे सार्वजनिक मंत्री दादा भुसे यांच्यात बैठक झाली. शिवतीर्थावर या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल सव्वा दोन तास बैठक झाली. यावेळी एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार गैरहजर होते. या बैठकीत टोलच्या संदर्भातील विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यानंतर राज ठाकरे यांनी मीडियाशी संवाद साधला.

मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

सार्वजनिक बांधकाम विभागाचे 29 आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे 15 असे 44 जुने टोलनाके बंद करण्यात यावेत अशी आमची मागणी होती. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका महिन्यात निर्णय घेतला जाणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे हे टोलनाके बंद होतील अशी आशा आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

कॅमेरे लावणार

मुंबईच्या पाचही एन्ट्री पॉइंटवर येत्या 15 दिवसात सरकार सीसीटीव्ही कॅमेरे लावणार आहेत. त्याचा कंट्रोलरुम मंत्रालयात असणार आहे. आमचेही सीसीटीव्ही कॅमेरे एन्ट्री पॉइंटवर असणार आहे. या टोलनाक्यावरून किती गाड्यांची ये जा होते हे मोजले जाणार आहे. टोल वाढणार, गाड्यांची संख्या वाढणार हे किती काळ सुरू राहणार आहे? असा सवाल करतानाच ही व्हिडीओग्राफी उद्यापासून सुरू करण्यात येणार असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं.

नऊ वर्षानंतर पुन्हा मुद्दा ऐरणीवर

काल सह्याद्रीला बैठक झाली. तिथे काही गोष्टी ठरल्या. पण ज्या लेखी स्वरुपात आल्या नव्हत्या. तिथे असं ठरलं की आज एक बैठक घेऊन लेखी स्वरुपात काही गोष्टी आणाव्यात. नऊ वर्षानंतर मी टोलच्या विषयासाठी मी सह्याद्रीला गेलो होतो. नऊ वर्षापूर्वी पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते. त्यावेळी काही गोष्टी ठरल्या होत्या. काही सुरू झाल्या. त्याचवेळी मला समजलं होतं टोलचे करार 2026ला संपणार आहे. ती नवीन गोष्ट नव्हती. पण काही सुधारणा होणं गरजेचं होतं.. त्यावेळी जे करार झाले त्यातही काही चुकीच्या गोष्टी होत्या. पण ते करार बँकेसोबत झाल्याने त्यात काही करता येत नव्हते. पण त्यावेळी काही सुधारणा व्हायला हव्या होत्या. त्या झाल्या नाहीत, असं राज यांनी स्पष्ट केलं.

RELATED ARTICLES

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

आंबेगाव तालुक्यातील अवसरी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) अवसरी आयेगाव तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या जवसरी खुर्द, अवसरी बुद्दक, गावडेवाडी या परिसरात पाऊस झाला. अवसरी खुर्द येथे साडेतीन...

Recent Comments