Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज जुन्या जमिनीच्या वादातून मोठ्या भावाने केला लहान भावाचा खून

जुन्या जमिनीच्या वादातून मोठ्या भावाने केला लहान भावाचा खून

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : शिवणे येथे राहणारा लहान भाऊ सूस गावात राहणाऱ्या मोठ्या भावाकडे गावाकडील जमिनीचा सात बारा मागण्यासाठी कुऱ्हाड घेऊन गेला. मोठ्या भावाने लाकडी बांबुने मारहाण केली. दुपारी घडलेल्या घटनेत गंभीर जखमी झालेल्या लहान भावाला मोठ्या भावाने रिक्षा घालून रात्री वारजे येथे आणले व रस्त्याच्या कडेला बसवून तो निघून गेला. गंभीर जखमी झालेला भावाला जवळपास १५ हून अधिक तास उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यु झाला.

लक्ष्मण गोबरिया रामावंत (वय ३५) असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत संतोष विश्वावत ऊर्फ पवार (वय १९, रा. शिवणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रिमराम गोबरिया रामावत (रा. सूस गाव) याच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांची आई, बहिण गंगा रामावत, दाजी लक्ष्मण रामावत त्यांच्या मुलांसह शिवणे येथे राहतात. मिळेल तेथे मजुरी काम करतात. लक्ष्मण रामावत यांचा मोठा भाऊ सूसगावातील पाटीलनगर येथे राहतात. ते मुळचे तेलंगणा येथील धनवाडा तालुक्यातील हनुमान तांडा येथील राहणारे आहेत त्यांच्या गावाकडील जमिनीवरुन दोघा भावांमध्ये वाद आहेत. मागील ९ दिवसांपूर्वी दोघांमध्ये वारजे येथील मजूर अड्ड्यावर जोरात भांडणे झाली होती. त्यावेळी दोघांनी एकमेकांना मारहाण केली होती. त्यांची बहिण गंगा रामावत या रेशन कार्डासाठी गावाकडे गेल्या होत्या.

फिर्यादी हे ३ जानेवारी रोजी सकाळी मजुरीसाठी जात असताना त्यांच्या चुलत बहिणीचा फोन आला. त्यात लक्ष्मण रामावत हे वारजे येथील सर्व्हिस रोडला बेशुद्धावस्थेत पडले असल्याचे सांगितले. फिर्यादी हे तातडीने रुग्णवाहिकेतून त्यांना माई मंगेशकर रुग्णालयात घेऊन गेले. तेथे डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच मृत झाल्याचे घोषित केले.

त्यानंतर फिर्यादी यांनी याची माहिती नातेवाईकांना दिली. तसेच ते लक्ष्मण यांचा मोठा भाऊ रिमराम याला जाऊन भेटले व लक्ष्मणचा मृत्यु झाल्याचे सांगितले. तेव्हा रिमराम म्हणाले की, २ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता लक्ष्मण जमिनीचा सातबारा मागण्यसाठी हातात कुऱ्हाड घेऊन सूसगावातील घरी आला होता. त्याने दारु पिली होती.

जमिनीचा सातबारा नाही दिला तर कुऱ्हाडीने मारुन टाकीन, अशी धमकी देऊन अंगावर धावून आला. मी त्याच्या हातातील कुऱ्हाड काढून घेऊन ती घराच्या पत्र्यावर टाकली. रागाच्या भरात तेथेच पडलेल्या लाकडी बांबुने लक्ष्मण याला मारहाण केली. त्यात लक्ष्मण जखमी झाल्याने निपचित पडला. सायंकाळ झाल्यानंतर त्यास कसेतरी उठवले. रात्री ९ वाजता रिक्षामध्ये घालून वारजे येथील पुणे-बंगलुरु महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर बाजूला बसवून घरी परत आलो. मी स्वतःहून हिंजवडी पोलीस ठाण्यात हजर होणार आहे, असे सांगितले. त्यानंतर दुसºया दिवशी ३ जानेवारी रोजी लक्ष्मण हे मृतावस्थेत आढळून आले होते. मुळ घटना सूस गावात घडली असल्याने वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तो हिंजवडी पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे.

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments