Saturday, July 13, 2024
Homeक्राईम न्यूजजीवनसाथी डॉट कॉमवरून ओळख झाली, मुलीच्या घरी जात तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले;...

जीवनसाथी डॉट कॉमवरून ओळख झाली, मुलीच्या घरी जात तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले; आता लग्नाला नकार दिल्याने बलात्काराचा गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : जीवनसाथी डॉट कॉम या वेबसाईटवर ओळख झाल्यानंतर लग्नाच्या आमिषाने शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार देणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुदर्शन संदिपान शिंगाटे (वय ३८, रा. चंद्रभागा आंगण, आंबेगाव, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी २८ वर्षीय पीडित तरुणीने सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. हा प्रकार जानेवारी २०२४ ते मे २०२४ या कालावधीत पीडित तरुणीच्या राहत्या घरी घडला आहे.

पोलिसांनी सांगितले की, पीडित तरुणी आणि आरोपी यांची जानेवारी २०२४ मध्ये जीवनसाथी डॉट कॉम या वेबसाइटवर ओळख झाली. त्यानंतर आरोपीने तरुणीला लग्न करण्याचे आमिष दाखवले. त्याने वेळोवेळी मुलीच्या घरी येऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. मुलीने आरोपीकडे लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने लग्न करण्यास नकार दिला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मुलीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments