Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज जीममध्ये दाम्पत्याला आरेरावी करत केली मारहाण, चार जणांवर गुन्हा दाखल

जीममध्ये दाम्पत्याला आरेरावी करत केली मारहाण, चार जणांवर गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : सोसायटीच्या जीममध्ये व्यायाम करण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला ‘जीम मधून बाहेर जा’ असे म्हणत चार जणांनी शिवीगाळ केली. तसेच जीम मधील कठीण वस्तूने डोळ्यावर मारून गंभीर जखमी केल्याचा प्रकार कोंढवा परिसरात घडला आहे. हा प्रकार एनआयबीएम रोडवरील एलीना लिव्हींग सोसायटीच्या जीममध्ये मंगळवारी (दि. २६) रात्री नऊच्या सुमारास घडला. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी जखमी संदिप आगरवाल यांची पत्नी श्वेता संदिप आगरवाल यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात बुधवारी (दि. २७) फिर्याद दिली आहे. यावरून रुपेश चव्हाण (३५), सागर शेजुळ (३७), राजू बिंद्रा (४०) आणि सॅम्युअल (३५, सर्व रा. एलीना लिव्हींग, एनआयबीएम रोड, मोहम्मदवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकाच सोसायटीत राहतात. मंगळवारी रात्री फिर्यादी व त्यांचे पती सोसायटीच्या जीममध्ये गेले होते. त्यावेळी आरोपी रुपेश चव्हाण याने ‘हि जिम सोसायटीमधील ए व बी विंग मधील सभासदांसाठी नाही, तुम्ही बाहेर जा’ असे म्हणत श्वेता यांच्या पतीसोबत वाद घालून शिवीगाळ केली.

त्यावेळी श्वेता या मध्यस्थी करत असताना सॅम्युअल त्यांच्या अंगावर धावून आला, आणि त्याने तुम्ही जिममध्ये येऊ शकत नाही असे सांगण्यास सुरूवात केली. त्याचवेळी राजू बिंद्रा याने संदिप आगरवाल यांना पाठीमागून पकडले. तर रुपेश चव्हाण याने जीममधील कठीण वस्तूने संदीप यांच्या डाव्या डोळ्यावर मारून गंभीर जखमी केले. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक वैभव सोनावणे करत आहेत.

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments