इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : गुइलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) बाधित आणखी एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या सहा झाली असून, गेल्या २४ तासांत नव्याने तीन जीबीएसबाधित रुग्ण सापडले. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील बाधित रुग्णसंख्या १७३ वर पोहोचली आहे. मागील तीन दिवसांपासून रुग्णसंख्या कमी होत असून, गुरुवारी दहा रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर आतापर्यंत ७२ रुग्ण बरे झाले आहेत.
जीबीएस रुग्णांची सर्वाधिक संख्या धायरी, नांदेडगाव, सिंहगड रस्ता, किरकटवाडी, खडकवासला या भागात आहे. तर पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर परिसरातही रुग्ण सापडले आहेत. पुणे शहर आणि जिल्ह्यात १७० संशयित जीबीएसबाधित रुग्णांपैकी १४० रुग्णांना जीबीएस झाल्याचे निदान निश्चित झाले आहे. बाधितांमध्ये ३४ रुग्ण पुणे महापालिका कार्यक्षेत्रातील असून, सर्वाधिक रुग्णसंख्या (८७) ही समाविष्ट गावांतील आहे.