Tuesday, October 29, 2024
Homeक्राईम न्यूजजिल्ह्यात मुसळधार पाऊस ! आज पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा आणि महाविद्यालयांना...

जिल्ह्यात मुसळधार पाऊस ! आज पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. अनेक धरणे 100 टक्के भरल्याने धरणांतून पाण्याचा विसर्गही वाढवला आहे. या अतिदक्षतेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहर परिसरात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे आज 26 सप्टेंबर (गुरुवारी) सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आले असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केले आहेत.

सध्या सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे सद्यस्थितीमध्ये जिल्ह्यातील सर्व धरणे भरलेली असून धरणक्षेत्रात पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. पाणलोट क्षेत्रामधील अतिपर्जन्यमानामुळे धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग कमी किंवा जास्त होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली आहे. या क्षेत्राच्या प्रभावामुळे राज्यात 28 सप्टेंबरपर्यंत पावसाची शक्यता आहे. दरम्यान, तीन दिवस राज्यात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात पाऊस पडणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments