Tuesday, April 29, 2025
Homeक्राईम न्यूजजास्त व्याजदराची एफ डी अन् नवीन पॉलिसी काढून देतो असे सांगून शिरूर...

जास्त व्याजदराची एफ डी अन् नवीन पॉलिसी काढून देतो असे सांगून शिरूर येथील महिलेची २१ लाख ४५ हजाराची फसवणूक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

शिरूर : शिरूर रामलिंग येथील महिलेची बँकेत जास्त व्याज देणारी एफडी व नवीन पॉलिसी करून देतो असं सांगून २१ लाख ४५ हजार रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत कल्पना अंकुश ढोरमले (वय 50 वर्ष व्यवसाय गृहिणी, रा. रामलिंग रोड, ओम रूद्रा कॉलनी, शिरूर, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी विकास गुलाब बेलदार (रा. लक्ष्मीनारायण नगर, चरोली, पुणे) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शिरूर पोलिसांना फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, 2022 पासून ते डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया शिरूर शाखा या ठिकाणी येउन एसबीआय लाईफ लाइफ इन्शुरन्सचे काम पाहणारा विकास गुलाब बेलदार (रा. लक्ष्मीनारायण नगर, चरोली, पुणे) याने मला बँकेच्या व्याजदरापेक्षा जास्त व्याजदर देणा-या एफ.डी. व नवीन पॉलीसी सुरू करून देतो असे खोटेनाटे सांगून माझ्याकडून एकूण सहा ब्लॅक चेक माझे सहीसह घेतले.

माझे नावे त्याने सांगितल्याप्रमाणे कोणतीही एफ. डी. अथवा नवीन पॉलीसी चालू न करता मला खोट्या पावत्या देऊन नवीन पॉलीसी व एफ. डी. चालू केल्याचे भासवले. आणि वेळोवेळी मी विश्वासाने दिलेले चेक वटवून माझ्या बँक खात्यातून स्वतःच्या बँक खात्यात २१ लाख ४५ हजार रुपये जमा करून घेऊन माझी आर्थिक फसवणूक केली. त्यानुसार ढोरमले यांच्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस स्टेशन येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे या करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments